Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'आधी म्हणाले तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे, आता म्हणतात, हे मी मान्य...

‘आधी म्हणाले तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे, आता म्हणतात, हे मी मान्य करतो…’; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

भोर | Bhor
राज्यात सध्या नगराध्यक्ष आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. आप आपल्या पक्षातील उमेदवारांसाठी नेत्यांच्या जोरदार सभा रंगताना दिसत आहे. त्यात आज सुपर संडे असल्याने आणि सोमवारी प्रचार संपत असल्याने राज्यातील प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यातच काही नेत्यांनी आपल्या भाषणात पैशांचा उघड उघड उल्लेख केल्याने विरोधीपक्षांनी टिका केली. तर काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, निधी मी देतो त्यामुळे घड्याळाला मतदान करा,’ असे विधान एका प्रचार सभेत केले होते. यावरून भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले की, आज लग्नाची तिथी आहे. तुम्हालाही अनेकांना लग्नाला जायचे असेल. मी टप्प्या टप्प्याने बारामती कशी बदलली ते तुम्ही पाहिले आहे. तुम्ही २ तारखेला घड्याळाचे चिन्ह दाबून आम्हाच्या उमेदवारांना निवडून द्या. एकदा मला संधी द्या, देऊन बघा. गेले २५ वर्ष तुम्ही ज्यांना संधी दिली, त्यापेक्षा पुढची ५ वर्ष मला द्या, कामं बघा. माझे काही बर वाईट व्हायचे ते पुणे जिल्ह्यातच होणार आहे. राज्य चालवत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात. अनेक घटनांमुळे तळपायाची आग मस्तकात जाते. मी आपल्या शहराचे व्हिजन मांडण्यासाठी आलेलो आहे.

- Advertisement -

मी ओघात बोललो पण, माझ्याकडे जे अधिकार आहेत…
इथे आल्यावर माझ्या सारख्याला एका ऊर्जा मिळत असते. उद्या मुख्यमंत्री येतील. ते त्यांची भूमिका मांडतील. पण, तुम्ही विचार करा. मी शब्दाचा पक्का आहे. मी कामाचा माणूस आहे. ठिक आहे मी परवा कुठे तरी बोललो की, तिजोरीची चावी माझ्याकडे आहे. मी ओघात बोललो. पण लगेच मीडियावाले.. माझ्या पेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे आहे हे मी मान्य करतो. पण माझ्याकडे जे अधिकार आहेत, त्याने तर मी प्रयत्न करणार, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या विधानावर सारवासारव केल्याचे दिसून आले.

YouTube video player

ज्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यांनी नाराज होऊ नये
ज्यांना उमेदवारी नाही मिळाली, त्यांनी नाराज होऊ नये. त्यांचा मी दुसरीकडे कुठं तरी विचार करेल. निवडून दिल्यावर मी कुठं लुडबुड करणार नाही. त्यांचे उमेदवार कसे ते तुम्ही ओळखा. मी दोन नंबर धंदेवाले उमेदवार दिलेले नाहीत. तुम्ही बघा कोणी दिलेत. मी कोणी दिले म्हणालो नाही. पण, तुम्ही बघा कोणी दिलेत, असे म्हणत अजित पवार यांनी भाजप आणि थोपटे यांनी दोन नंबरचे धंदेवाले उमेदवार दिल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Maharashtra ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडणार, कोणत्याही क्षणी...

0
मुंबई । Mumbai राज्यात सध्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याचे संकेत मिळाले आहेत. महानगरपालिकांचे निकाल...