Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार; अजित पवारांची पुण्यातून मोठी घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार; अजित पवारांची पुण्यातून मोठी घोषणा

पुणे | Pune

आगामी विधानसभा निवडणुका महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) सर्वच पक्ष एकत्रितपणे लढवण्यावर ठाम आहेत. यात महायुतीमधील तिन्ही पक्षांचे सध्या मेळावे घेतले जात असून या मेळाव्यांतून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा दावा तिन्ही पक्षांकडून केला जात आहे. अशातच आज पुण्यात अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून बोलतांना अजित पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : “उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते”; अमित शाहांचा घणाघात

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, आपण महायुती म्हणून लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही (Vidhansabha Election) एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Bodies Election) स्वतंत्र लढायच्या आहेत,अशी घोषणा पवार यांनी केली. त्यामुळे महायुती ही केवळ विधानसभेपुरतीच मर्यादित राहिली असून महायुतीमधील तिन्ही पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे देखील वाचा : शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार – अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

दरम्यान, मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला या निवडणुका (Election) केव्हा होणार, असा प्रश्न पडला आहे. लोकसभा निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढवली. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात असतानाच अजित पवार यांनी विधानसभा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज आपली भूमिका मांडली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या