नागपूर | Nagpur
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने महायुतीतील अनेक जेष्ठ नेते नाराज झाले आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद न दिल्याने त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाहीर नाराजी व्यक्त करत नाशिकला परतले. छगन भुजबळ यांनी अधिवेशनाला जाणार नसल्याचं म्हटलं. पक्षाकडून देण्यात आलेली राज्यसभेची ऑफर देखील छगन भुजबळ यांनी धुडकावली असल्याचा पाहायला मिळाले. तर दुसरीकडे मोठी घडामोड घडली आहे. मागील २४ तासांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोणालाही भेटले नाही. अजितदादा नॉट रिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या २४ तासांपासून कुणालाच भेटले नसल्याची माहिती मिळत आहे. ते अधिवेशनालाही हजर नव्हते. ते आजही अधिवेशनाला हजर राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे अजित पवार कुठे आहेत याबाबत प्रश्न विचारला जात आहे. अजित पवार नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री यांचे निवासस्थान असलेल्या विजयगडमध्ये असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नागपुरातील विजयगड निवासस्थानी येणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार बंगल्यावर नसल्याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड होत आहे. तर, दुसरीकडे अजितदादा नॉट रिचेबल नसल्याने चर्चांना उधाण आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधीमंडळाच्या अधिवेशनाबाबत प्रचंड गंभीर असतात. सभागृहातल्या कामकाजात हे आवर्जून असतात. आता, महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख झाल्यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या आहेत. अजित पवारांकडे मागण्यांचे निवेदन घेऊन येणाऱ्यांची संख्याही चांगलीच असते. मात्र, अजित पवार हे मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, अजित पवार कुठेही नॉट रिचेबल झालेले नाहीत. ते त्यांचे नियमित कामकाज करत आहेत. ते नागपुरातील त्यांच्या निवासस्थानीच आहेत. त्यांनी काल पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या.
भुजबळ नाराज…
महायुतीच्या सत्तेत मंत्रिपदावरून डावलले गेल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. सोमवारी नागपूरमध्ये त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत, ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’ असे सूचक विधान केले होते. जरांगेंना अंगावर घेण्याचे बक्षीस मला मिळाले. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावलले जातेय. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय, मला काही फरक फडत नाही. अशी मंत्रिपदे किती वेळा आली आणि गेली, मी कधीही संपलेलो नाही. पण मी नाराज आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. ते सोमवारी (दि. १६) नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये परतले.