Saturday, May 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा इंडिया आघाडीनं लावून धरावा,...

Rohit Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा इंडिया आघाडीनं लावून धरावा, राहुल गांधींच्या…, रोहित पवारांची मागणी

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील चौकशीच्या नावाखाली केवळ फार्स सुरू असून, व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना पोलीस प्रशासनाकडून ‘व्हीआयपी’ वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. हा केवळ अपघात नसून तो एक नियोजनबद्ध ‘घातपात’ असल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी रोहित पवार यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक विशेष समिती स्थापन करण्यात यावी आणि त्याचे अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडे सोपवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबत राहुल गांधींच्या निकटवर्तीयांशी चर्चा झाली असून, ‘इंडिया’ आघाडीने हा मुद्दा लावून धरावा, असेही ते म्हणाले. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे देखील या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, वरिष्ठ स्तरावर चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांच्या कुटुंबानेही या घटनेवर शंका उपस्थित केल्याने, सत्तेतील नेत्यांनी आपली ताकद वापरून या तपासाला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी सीआयडीच्या तपासावर ताशेरे ओढताना सांगितले की, व्ही. के. सिंग यांची सीआयडी कार्यालयात झालेली आठ तासांची चौकशी ही केवळ औपचारिकता होती. या काळात सिंग यांचा एखाद्या पाहुण्याप्रमाणे आदरतिथ्य करण्यात आले. त्यांना चहा, नाश्ता आणि जेवणासोबतच चक्क टीव्हीवर भारत विरुद्ध इंग्लंडची क्रिकेट मॅच पाहण्याची मुभा देण्यात आली. एका गुन्हेगारी तपासाला सामोरे जाणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारे सवलती मिळणे हे तपासाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे, असे पवार म्हणाले.

या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, सिंग यांच्यासोबत त्यांचे खासगी सशस्त्र अंगरक्षकही तपास कार्यालयात उपस्थित होते. इतकेच नव्हे तर, माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून वाचवण्यासाठी पोलिसांनी सिंग यांना स्वतःच्या काळ्या काचेच्या गाडीतून बाहेर काढले. या सर्व कृतीतून पोलीस प्रशासनावर मोठा राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट जाणवते. सत्तेत असूनही अजित पवारांना या प्रकरणात अद्याप न्याय मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची खंत रोहित पवार यांनी व्यक्त केली.

तपासातील दिरंगाईबद्दल बोलताना त्यांनी एआयबीच्या (AIB) अहवालाचा दाखला दिला. अहवाल येऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप या प्रकरणात एफआयआर (FIR) दाखल का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. २०१९ मधील घाटकोपर विमान अपघातावेळी तातडीने गुन्हा दाखल झाला होता, मग अजित पवारांच्या बाबतीत पोलिसांना कशाची प्रतीक्षा आहे? असा प्रश्न विचारत, या विलंबामुळे पुरावे नष्ट होण्याची भीती त्यांनी वर्तवली. या कंपनीत काही बड्या नेत्यांचा आणि उद्योगपतींचा पैसा गुंतलेला असल्यानेच सिंग यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

रोहित पवार यांनी २०२३ मधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानाशी संबंधित एका घटनेचा संदर्भ देत यामागे मोठे कारस्थान असण्याची शक्यता वर्तवली. शिंदे यांचे विमान इराणच्या हवाई हद्दीत धोक्यात आले होते, ते विमानही याच व्हीएसआर कंपनीचे होते. जर एकाच कंपनीच्या विमानांबाबत वारंवार अशा घटना घडत असतील, तर त्यामागे नक्कीच काहीतरी ‘कॉन्स्पिरसी’ असू शकते. अजित पवारांना मुद्दाम नादुरुस्त विमान दिले गेले होते का, याचा शोध घेण्यासाठी सखोल गुन्हेगारी चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...