Sunday, October 27, 2024
Homeनगर“उद्या आपली सत्ता असो वा नसो, लोकांना...”, लंकेंच्या मतदारसंघात अजित पवार असं...

“उद्या आपली सत्ता असो वा नसो, लोकांना…”, लंकेंच्या मतदारसंघात अजित पवार असं का म्हणाले?

पारनेर | तालुका प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पारनेर (Parner) दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच यावेळी अजित पवारांनी धडाकेबाज भाषण केलं. संपूर्ण भाषणात अजित पवारांनी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली.

- Advertisement -

आधुनिक गाडगे बाबा म्हणून आर.आर आबांची ओळख होती, आता आधुनिक श्रावण बाळ म्हणून आमदार निलेश लंके यांची ओळख असल्याचंही पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं आहेत. करोना काळात केलेल्या लंकेंच्या कामाचा उल्लेखही पवारांनी यावेळी केला आहे. त्यासोबतच लंकेंच्या मतदारसंघात विविध विकासकामं करण्याचं आश्वासन अजित पवारांना यावेळी दिलं आहे. पारनेर (Parner) माझे आजोळ असल्याने मला या जिल्ह्याची माहिती आहे. काही भागत दुष्काळी परिस्थतीमुळे नेहमीच शेतकरी अडचणीत असतो. उजनी धरण साठ टक्के भरले, कुकडी निळवंडे मुळा अशी धरणे भरले, तर पाण्याचा प्रश्न मिटतो.. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी देवीला साकडे घालू, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार यांनी, माझ्या वेगवेगळ्या भागातील लोकांची कामे होणे गरजेचे आहे. निलेश लंके जेव्हा मागायला येईल, तेव्हा पंधराशे कोटी रुपयांची कामे झालेली आहे. आम्ही सत्तेला हपापलेलो नाही सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नाही, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला? याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. उद्या आपली सत्ता असो वा नसो, लोकांना त्याच्याशी काही घेणे-देणे नाही; पण त्यांच्या कामाशी घेणे-देणे आहे. आमदार लंकेंच्या काम पाहून तुम्ही निवडलेल्या लोकप्रतिनिधींबाबत तुम्हालाही त्यांचा अभिमान वाटत असेल, अशा भावनाही अजित पवारांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या