Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : नवीन मंत्र्यांचे खातेवाटप कधी? अजित पवार म्हणाले, यादी...

Ajit Pawar : नवीन मंत्र्यांचे खातेवाटप कधी? अजित पवार म्हणाले, यादी…

मुंबई | Mumbai

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होत अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटातील ९ आमदारांनी (MLA) मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांना शपथ घेऊन जवळपास १२ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही त्यांचे खातेवाटप (Portfolio Allocation) झालेले नाही. अशातच आता खातेवाटपावर स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे….

- Advertisement -

Chandrayaan 3 : भारताची भरारी! ‘चांद्रयान -३’ ची अवकाशात ऐतिहासिक झेप

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, कुणाला कुठले खाते द्यायचे तो अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना (CM) असतो. आम्ही आता त्यांच्या मंत्रिमंडळात (Cabinet) गेलो आहे. ते आता जी जबाबदारी देतील ते पार पाडायची. तर पुरवणी मागण्यांच्या संदर्भात काल एक बैठक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली होती. आता जी मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. त्याबाबत मला काही माहिती नाही, असे अजित पवारांनी म्हटले.

१६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस; दिले ‘हे’ आदेश

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, मला मिळालेल्या माहीतीनुसार खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे (Governor) गेली असून राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याबाबत आदेश निघेल आणि कोणाला कोणती खाती मिळाली, हे समजेल. त्यानंतर राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री पदभार स्वीकारून कामाला सुरुवात करतील, असे त्यांनी सांगितले.

खातेवाटपाचा तिढा सुटला! अर्थ खातं अजित पवारांकडेच, भुजबळांना मिळणार मोठी जबाबदारी; लवकरच होणार घोषणा

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते मिळण्याची शक्यता असून मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांना कृषी खाते, धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय खाते, अनिल पाटील यांना अन्न व नागरी पुरवठा खाते, धर्मराव बाबा आत्रामांना परिवहन मंत्रालय, आदिती तटकरेंना महिला व बालकल्याण, हसन मुश्रीफांना अल्पसंख्यांक मंत्रालय, आणि संजय बनसोडे यांना क्रीडा खाते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

गौरवास्पद ! पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

- Advertisment -

ताज्या बातम्या