Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीचे फायर आणि एनर्जी ऑडिट करणार - अजित पवार

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीचे फायर आणि एनर्जी ऑडिट करणार – अजित पवार

पुणे (प्रतिनिधी) –

पुण्यातील सिरम इस्टिट्युटला लागलेली आग आटोक्यात आली असून उद्या फायर आणि एनर्जी ऑडिट केले जाईल आणि त्यामध्ये काही

- Advertisement -

आढळल्यास पुढील चौकशी केली जाईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.दरम्यान, नक्की आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसून उद्या सकाळी फायर आणि एनर्जी ऑडिट केल्यानंतर हे स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.

सिरम इस्टिट्युट ला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला त्यानंतर संध्याकाळी अजित पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आज पाच मृतदेह हाती लागले असले तरी उद्या संपूर्ण पाहणी करून अजून जीवित हानी झाली आहे का याची शहानिशा केली जाईल आत्ता धूर आहे आणि लाईट नसल्यामुळे संपूर्ण अंधार आहे त्यामुळे अजून काही जीवित हानी झाली आहे का याबाबत नक्की सांगता येणार नाही. 99 टक्के पाचपेक्षा जास्त जीवित हानी झालेली नसेल परंतु, खरी काय परिस्थिती आहे ती उद्या समजेल असे त्यांनी सांगितले.

सिरम इन्स्टिट्यूट मोठी आहे त्यामुळे प्रतीबंधक ज्या गोष्टी करायच्या असतात त्या त्यांनी सर्व केलेल्या. होत्या परंतु आग मोठ्या प्रमाणात भडकल्याने त्याचा उपयोग होऊ शकला नाही.मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली तेव्हा ते आज आग लागलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते त्याच इमारतीला ही आग लागली परंतु ती तिसरा मजल्याला लागली. त्या ठिकाणी वेल्डिंग चे काम सुरू होते त्यातून ठिणगी उडून ही आग लागल्याचे ऐकीव माहीती दिली जात आहे. अशी माहिती ती दबक्या आवाजात दिली जात आहे. परंतु ऑडिट रिपोर्ट आल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येईल येईल असे पवार म्हणाले.

या इमारतीला आग लागली तिथे ‘रोटा’ नावाच्या लसीची साठवणूक करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा लागतात त्याचे काम सुरू होते. सिरम इन्स्टिट्यूटचे याठिकाणी दोन एसईझेड आहेत त्यामुळे एसईझेड साठीच्या सर्व गाईडलाईन्स चे पालन केले आहे का? सर्व नियमावलीचे पालन केले आहे का? याची माहिती घेतली जाईल आणि त्यानुसार पुढील चौकशी केली जाईल आत्ताच कुठलाही निर्णय घेणे किंवा त्याबाबत बोलणे हे आततायीपणा चे ठरेल असेही पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या