Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयअजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी; फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी; फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ

मुंबई | Mumbai

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जय्यत तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह आमदारांनी मुंबईतील सिद्धिविनायक (Siddhivinayak Darshan) मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. यानंतर अजित पवारांनी माध्यमाशी बोलतांना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा : मिहिर शहा गुवाहाटीला पळाला की सुरतला?; वरळी अपघातावरुन राऊतांचा हल्लाबोल

यावेळी बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, आम्ही जनतेसमोर त्यांचे आशिर्वाद मागण्यासाठी जात आहोत. सिद्धीविनायकाने आम्हाला आशिर्वाद द्यावेत त्यासाठी विजयाची खूण दाखवली आहे. शेवटी जनता-जनार्दन सर्वकाही असते. लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्यासमोर जाणार आहोत. चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकारी यांना घेऊन दर्शनाला आलो आहे. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये (Baramati) आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उबर कॅबमधून गांजा तस्करी

अजित पवार पुढे म्हणाले की, आगामी विधानसभेच्या (Vidhansabha) निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या कोणत्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहचवणे आणि पुढे वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणे आणि हे करताना मुंबईत असल्याने आम्ही सिध्दीविनायकचे दर्शन घेत आहोत. विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) नाही तर विधानसभेच्या निमित्ताने तसेच आमचा पक्ष (Party) मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रचाराची सुरुवात करत आहे, असेही त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Police Recruitment : प्रश्न आणि उत्तरांच्या पर्यायात संदिग्धता

विधान परिषदेसाठी आम्हाला जे योग्य वाटेल ते करणार

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात असून महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षांकडून आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले विधान परिषदेसाठी आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करणार आहोत. तसेच आपला उमेदवार निवडून येण्याकरता सर्व पक्ष प्रयत्न करतात. सर्वजण त्या प्रकारचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण सभापतींच्या निवडीच्या दृष्टीने तो निर्णय घ्यायचा आहे. सरकार म्हणून महायुतीचे पक्ष एकत्र मिळून निर्णय घेतील, असे त्यांनी म्हटले.  

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या