Tuesday, May 20, 2025
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : अजित पवारांची नाशिक दौऱ्यात ‘मोदी स्टाईल’, 'वंदे भारत ट्रेन'मध्ये...

Ajit Pawar : अजित पवारांची नाशिक दौऱ्यात ‘मोदी स्टाईल’, ‘वंदे भारत ट्रेन’मध्ये प्रवाशांसोबत निवांत गप्पा आणि सेल्फी… पाहा VIDEO

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री नवनिर्वाचित अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आज नाशिकमध्ये (Nashik Visit) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज नाशिकमध्ये येणार आहेत.

दरम्यान, नाशिकपर्यंतचा प्रवास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदे भारत ट्रेननं केला. यावेळी रेल्वेमधील अनेक प्रवाशांनी अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला. या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजित पवार म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा, असे सांगत आपल्यासोबत असणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले.

अजित पवार यांनी ठाण्यावरुन नाशिकसाठी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. यावेळी प्रवाशांनी अजित पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. अजित पवार हे वृत्तपत्र वाचत प्रवास करत होते. त्यातच अनेक प्रवासी अजित पवार यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत होते. तसेच वंदे भारत एक्सप्रेसमधील कर्मचाऱ्यांनीही अजित पवार यांच्यासोबत सेल्फी घेल्याचे दिसले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राहुल

“राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर…”; भाजपाचे राहुल गांधीवर जोरदार...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. एकीकडे, सरकार या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि...