Saturday, September 21, 2024
Homeराजकीय“मी कोणताही पक्ष बदललेला नाही, माझा दोष फक्त इतकाच की…” अजितदादांच्या VIDEO...

“मी कोणताही पक्ष बदललेला नाही, माझा दोष फक्त इतकाच की…” अजितदादांच्या VIDEO ची चर्चा

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर केला, त्यावर विरोधकांनी सडकून टीका केली. त्याला अजितदादांनी व्हिडिओ ट्विट करत सडेतोड उत्तर दिले आहे. बाकीचे नेते राजकारण करतात, पण हा अजितदादा काम करतो, असे सांगत अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे. तसेच आपण अर्थमंत्री म्हणून मांडलेल्या अर्थसंकल्पाचा सामान्य जनतेला कसा फायदा होणार आहे, हे अजित पवार यांनी जनतेला पटवण्याचा प्रयत्न या व्हीडिओच्या माध्यमातून केला आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला आहे. असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. आजवर आपण पाहात आलोय की प्रत्येक कुटुंबातील आई स्वत:वरील खर्चाची काटकसर करून मुलांना काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असते. पण आर्थिक अडचणींमुळे कधीकधी घरातल्या मुलींकडे दुर्लक्ष होतं. पण या योजनेमुळे राज्यातील माता-भगिनींची ही विवंचना दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील.

अनेक नकारात्मक लोक या अर्थसंकल्पावर अकारण टीका करत आहेत. त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे. काहींकडून तर या अर्थसंकल्पाला लबाडाच्या घरचं अवताण आणि यासारखी बरीच नावं ठेवून हिणवलं जात आहे. मला इतकंच सांगायचंय की या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आहेत आणि तुमचा दादा काम करणारा आहे. मी गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याबदल्यात मला शिव्या-शाप मिळतायत. माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दु:ख आणि वेदना समजून घेतल्या. सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.

अर्थसंकल्पात आम्ही ४४ लाख शेतकऱ्यांचं वीजबिल माफ केलं आहे. हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी ३५० रुपये प्रतिक्विंटल अनुदान दिलं याला त्यांचा विरोध का? यावरून कोण शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला लक्षात आलं असेलच.

- Advertisment -

ताज्या बातम्या