Tuesday, April 28, 2026
HomeनगरShirdi : द्वारकामाईत आढळले चक्क सोन्याचे घड्याळ!

Shirdi : द्वारकामाईत आढळले चक्क सोन्याचे घड्याळ!

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

द्वारकामाईमध्ये आजीवन साईबाबांचा वास होता. याच द्वारकामाईत संस्थानच्या दोन कर्मचार्‍यांना चक्क सोन्याचे घड्याळ आढळले. त्यांनी ते मौल्यवान घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतूक होत आहे. गुरुवारी द्वारकामाई येथे साईबाबा मंदिर विभागाचे कर्मचारी रशीद गुलाब शेख आणि संरक्षण विभागाच्या महिला कर्मचारी रंजना कुंभार यांची ड्युटी होती. साईबाबा ज्या पवित्र शिळेवर बसत त्या ठिकाणी रशीद शेख यांना एक महिलेचे घड्याळ आढळून आले. त्यांनी तत्काळ ते संरक्षण कर्मचारी रंजना कुंभार यांना कळवले. घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा करताना लक्षात आले की ते सोन्याचे आणि अत्यंत मौल्यवान आहे.

- Advertisement -

सोनाराकडून वजन करून पाहिले असता त्याचे वजन 22 ग्रॅम निघाले. जे सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 2 लाख रुपये होते. या घड्याळाच्या डायलवर ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरियांची प्रतिमा होती. जे याला अधिक ऐतिहासिक आणि मौल्यवान बनवते. त्याचप्रमाणे या दोन्हीही साईबाबा संस्थान कर्मचार्‍यांची ही कामाप्रती असलेली प्रामाणिकता, करोडो भक्तांची बाबाप्रती असलेली भक्ती अधिक मजबूत करते. साईबाबा संस्थानचे हे दोन्ही कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कुठलाही मोह न ठेवता घड्याळ संरक्षण कार्यालयात जमा केले. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

Shrirampur : नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूरातही भोंदूबाबाला अटक

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur पोटदुखीवर उपचार करून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची फसवणूक करत, तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर...