Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याअजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संभाजीराजेंचे मोठं विधान म्हणाले...

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संभाजीराजेंचे मोठं विधान म्हणाले…

मुंबई | Mumbai

अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सरकारमध्ये सहभागी होताच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा खरा अध्याय सुरू झाला.

- Advertisement -

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, असे दावे राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून वारंवार करण्यात आले. या दाव्यांवर चर्चा होत असतानाच आता स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा छत्रपती संभाजीराजे यांनी केला. तसेच राष्ट्रवादीचे सध्या भाजपसोबत आलेले नऊ मंत्री शरद पवार यांच्याकडेच पुन्हा जातील, असा दावाही त्यांनी केला.

मी चॅलेंज देऊन सांगतो, की अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांकडे परततील, हा सर्व ठरवून झालेला प्लान आहे, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे हेच राहणार. अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाणार नाही. हे केवळ लोकसभा निवडणुकांसाठी जुळविलेले गणित आहे, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार ईडीच्या भीतीमुळे सत्ताधाऱ्यांना जावून मिळाल्याची टीका केली आहे. अजित पवारांनी आपल्या बारामतीच्या सभेत मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो असतो असे विधान केले. यावरून ते आपली मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजपसोबत गेले हे दिसते. पण ते खरे नाही. ते सत्तेसाठी नव्हे तर ईडीच्या भीतीमुळे गेलेत. हे महाराष्ट्रातील जनतेचा ठावूक असल्यामुळे आगामी निवडणुकांत त्याचे परिणाम दिसतील, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या