नाशिक | Nashik
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांत सुरु आहे. त्यामुळे या यात्रेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्य सरकारने आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची माहिती महिला वर्गापर्यंत पोहचवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवारांची जनसन्मान यात्रा (Jansanman Yatra) जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात (Sinnar Assembly Constituency) होती. यावेळी त्यांनी याठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिलांना (Women) संबोधित करतांना विविध विषयांवर भाष्य केले. तसेच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे करण्यासाठी माझाही प्रयत्न सुरु असल्याचे पवारांनी आवर्जून सांगितले.
हे देखील वाचा : ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन
यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, “जनसन्मान यात्रेचा आजचा राज्यातील तिसरा दिवस आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर जनतेसाठी सरकारने काय केलं, कोणत्या योजना हाती घेतल्या, त्या योजना सांगण्यासाठी ही जनसन्मान यात्रा आम्ही काढली आहे. अण्णाभाऊ म्हणायचे की, पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नसून कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. कुठल्याही क्षेत्रातला कामगार हा त्या क्षेत्राचा कणा असतो. त्यावरतीच देश उन्नती करतो आणि उभा राहतो. त्यामुळे देशामध्ये कामगारांचा सन्मान झाला पाहिजे”, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : जरांगेंच्या आंदोलनामागे महाराष्ट्रातील ‘या’ दोन बड्या नेत्यांचे राजकारण; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “सिन्नर येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची मागणी करण्यात आली असून त्याची अर्थसंकल्पात तरतूद केली गेली आहे. त्यामुळे आता ते पूर्ण कसे होईल यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत.
सिन्नरची वसाहत चांगल्यापैकी सुरू आहे. एमआयडीसी आणि महावितरणचे प्रमुख उदय सामंत यांना बोलावून आम्ही येथील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीबाबत ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू”, असे अजित पवार यांनी म्हटले. तसेच नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे करण्यासाठी माझाही प्रयत्न सुरु असल्याचे पवारांनी आवर्जून सांगितले.
हे देखील वाचा : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची मंजुरी
ते पुढे म्हणाले की,”विरोधक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवर (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) टीका करत आहेत. तुम्ही सरकारमध्ये असून काय केले? देवळात वाजवण्याची घंटाही त्यांनी दिली नाही. टीका करणारे सोन्याचा चमचा घेऊन येणारे आहेत. त्यांना दीड हजार रुपयांची किंमत काय कळणार, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. त्यासोबतच आजपर्यंत बांधल्या नाही एवढ्या राख्या तीन दिवसांत मला बांधल्या आहेत. त्यामुळे या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही,आर्थिक शिस्त आम्हाला कळते १० वर्ष अर्थसंकल्प सादर करणे हे काही येड्या गबळ्याचे काम नाही”, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांना दिला.
हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात डेंग्यूचा कहर; सात महिन्यांत ‘इतके’ रुग्ण, तिघांचा मृत्यू
तसेच “महाराष्ट्रात गुंतवणुकीचा वेग वाढलेला आहे. टोयोटा किर्लोस्करचा प्रकल्प संभाजीनगरला येत आहे, जिंदल ग्रुपचे ४०-४० हजार कोटींचे दोन प्रकल्प महाराष्ट्रात आणत आहोत. उद्योग क्षेत्रात कामगारांसाठी प्रशिक्षणाच्या योजना चालू आहेत. जपान आणि फ्रान्समध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या कुशल मनुष्य बळाला मागणी आहे. बाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता तरुण-तरुणींनी ठेवली पाहिजे”, असेही अजित पवारांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.