Monday, May 26, 2025
HomeनगरShirdi : मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी आकाश अंबानी पाचव्यांदा साई चरणी

Shirdi : मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी आकाश अंबानी पाचव्यांदा साई चरणी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचे मालक आकाश अंबानी (Akash Ambani) यांनी साईबाबा समाधीचे दर्शन (Sai Baba Samadhi Darshan) घेतले. सोमवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात सामना होणार असल्याने मुंबईच्या विजयासाठी त्यांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली.

आयपीएल हंगाम सुरु झाल्यापासून अंबानी कुटुंबीयांचा शिर्डी (Shirdi) दौरा लक्षणीय ठरतो आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या यशासाठी निता अंबानी, आकाश अंबानी तसेच स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे वेळोवेळी शिर्डीत येऊन साईदर्शन घेत आहेत. हंगामाच्या सुरुवातीला निता अंबानी (Nita Ambani) यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी शिर्डीत येऊन साईबाबांच्या शेजारतीत हजेरी लावली होती. त्या दिवशी मुंबईचा विजय झाल्याने मंदिर परिसरात चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते.

आकाश अंबानी यांची साईदर्शनासाठी ही पाचवी भेट ठरली. प्रत्येक सामन्याच्या पूर्वसंध्येला ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. यावेळी त्यांनी साई समाधीवर निळ्या रंगाची चादर अर्पण केली. दर्शनानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सन्मान केला. आकाश अंबानी यांनी द्वारकामाई व गुरुस्थान मंदिरातही दर्शन घेतले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी अवघ्या तीन तासातच नाशिक दौरा आटोपला;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आजपासून (सोमवार) दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले होते. आगामी होऊ...