Monday, November 25, 2024
Homeभविष्यवेधशनीच्या अशुभ प्रभावात अखिलेश!

शनीच्या अशुभ प्रभावात अखिलेश!

अखिलेश यादव यांचा जन्म 1 जुलै 1973 रोजी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सैफई येथे मालती देवी आणि मुलायम सिंह यादव यांच्या पोटी झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सैफई येथील स्थानिक शाळेत आणि शालेय शिक्षण राजस्थानच्या ढोलपूर येथील ढोलपूर मिलिटरी स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी जेएसएस सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, म्हैसूर, कर्नाटक, भारत येथे सिव्हिल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंगमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. अखिलेश यादव यांनी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.

2000 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत कन्नौजमधून 13 व्या लोकसभेवर ते निवडून आले. 2004 मध्ये दुसर्‍यांदा 14 व्या लोकसभेचे सदस्य झाले. अखिलेश 2009 ला पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. 10 मार्च 2012 रोजी त्यांची उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली. 15 मार्च 2012 रोजी, वयाच्या 38 व्या वर्षी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. या पदावर पोहचलेले ते उत्तर प्रदेशचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. पाच वर्षांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सपा-काँग्रेस आघाडीचा पराभव झाल्याने राज्यातील सरकार गेले.

- Advertisement -

अखिलेश यादव यांनी वडील, मातब्बर समाजवादी नेते मुलायम सिंग यादव यांच्याविरुद्ध बंड करून समाजवादी पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. या घटनेमुळे उत्तरप्रदेशात एकहाती सत्ता उपभोगणारा यादव परिवारात फूट पडली. त्याचा फायदा भाजपाला झाला. अखिलेश यांची वडीलांविरोधात बंड करण्याची मानसिकता कधी व का झाली? कोणत्या ग्रह रेषांमुळे झाली व त्यांचा पुढचा राजकीय प्रवास कसा असेल याचा उलगडा त्यांच्या डाव्या व उजव्या हातावरील ग्रह रेषांवरून पहाणार आहोत.

हस्तरेखाशास्त्राद्वारे व्यक्तीच्या स्वभावातील अनेक पैलू समोर येतात. व्यक्तिमत्वातील पैलू हे हातावरील ग्रहांची शुभ अशुभ स्थिती व स्थान, हातावरील ग्रहांवरून मार्गस्थ होणार्‍या रेषेंचा प्रवास, ग्रहांवर जाऊन पोहोचलेल्या रेषा, ग्रहांकडे खेचल्या गेलेल्या रेषा, इत्यादी अनेक बाबी व्यक्तिमत्तवतील पैलू दाखवितात. ग्रह व रेषांच्या संयोगाने स्वभाव वैशिष्ठये माहित होत असताना, बोटांच्या खाली असलेले ग्रह, अनुक्रमे पहिल्या बोटाखालील गुरु, दुसर्‍या शनी, तिसर्‍या रवी व चौथ्या करंगळीच्या खाली बुध ग्रह विराजमान असतो. हातावरील पहिली आडवी रेषा म्हणजे हृदय रेषा व्यतीच्या स्वभाव वैशीठ्यात निर्णायक गुणधर्म प्रदान करते. तसेच हृदय रेषा बोटांखालील मुख्य ग्रहांची सीमा रेषा म्हणून काम करते, यात हृदय रेषेचा हातांवरील असलेल्या स्थितीनुसार ग्रहांचा आकार छोटा-मोठा करण्याचे किंवा सीमित करण्याचे काम करते. ज्या वेळेस ग्रह हृदय रेषेमुळे आकाराला छोटा मोठा करते त्या वेळेस ग्रहावर अशुभ प्रभाव पडतो. बोटांखालील ग्रह बोटांच्या जाडी इतक्या रुंदीत सीमित असतील व हृदय रेषा गुरु ग्रहावर उगम पाऊन कमानदार आकार घेऊन करंगळीच्या खाली, हाताच्या बाहेर जाऊन थांबली तर ग्रह प्रमाणात आकाराचे असतात वत्यांच्यात अशुभत्व सहसा येत नाही.

उजवा हात – हृदय रेषेनंतर स्वभावातील गुणधर्म हे मस्तक रेषेच्या उगमापासून म्हणजे पहिल्या बोटाखाली आयुष्य रेषा व त्यांची एकत्रित किंवा स्वतंत्र उगम असो, अथवा दोनही रेषांचे अंतर उगम स्थानी कसे आहे, कमी आहे कि जास्त, त्यानुसार स्वभावातील विविध गुण वैशिष्ट्यांची व बारीक सारीक अचूक माहिती होते. बोटांच्या व पंज्याच्या आकारावरून व विशेषतः अंगठ्याच्या आकारावरून व मजबुतीनुसार, त्यावर असलेल्या दोन पेरांच्या आकारानुसार व्यक्तीच्या मानसिकतेची कल्पना येते. अखिलेश यांची आयुष्य रेषा व मस्तक रेषा वय वर्ष 35 पर्यंत एकत्र आहे. आयुष्य रेषा मस्तक रेषा यांचा उगम जर लांबपर्यंत एकत्र असेल तर अशा व्यक्ती त्या वय वर्षापर्यंत स्वतंत्र निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसतात. ज्या वेळेस मस्तक रेषा, आयुष्य रेषेपासून स्वतंत्र होते त्या वय वर्षापासून व्यक्तीमधे निर्णय क्षमता येते. मस्तक रेषा स्वतंत्र झाल्यानंतर मस्तक रेषेची हातावरची स्थिती कशी आहे, त्यानुसार त्या व्यक्तीची निर्णय क्षमतेची गुणवत्ता असते. हस्तसामुद्रिकशास्त्राप्रमाणे हातावर असलेल्या पहिल्या दोन आडव्या रेषा म्हणजे हृदय रेषा व मस्तक रेषेत हाताच्या आकाराच्या दृष्टीने अंतर कमी असेल तर असे लोक बेचैन असतात. असुरक्षित मानसिकता असते, माझे कसे होईल याची त्यांना कायम चिंता असते व वृथा काळजी करीत असतात. वाईट विचार येतात. हृदय रेषा व मस्तक रेषा हातावरील चार ग्रहांपैकी एका ग्रहाकडे एक मिलीमीटर जरी वर खेचल्या गेलेली असेल तर त्या वय वर्षांत ती व्यक्ती खेचले गेलेल्या ग्रहांचे अशुभ परिणाम भोगत असते. अखिलेश यांच्या हातावरील मस्तक रेषा व आयुष्य रेषा वयवर्ष 35 पयर्र्ंत एकत्र आहेत. नंतर स्वतंत्र झालेली मस्तक रेषा शनी ग्रहाकडे वक्र होऊन खेचली गेलेली आहे. मस्तक रेषा वय वर्ष 35 ते 55 पर्यंत शनी ग्रहाच्या अधिपत्याखाली खेचली गेल्याने, अखिलेश यांच्या अंगी शनी ग्रहाच्या नकारात्मक विचार धारणेचा अशुभ परिणाम झाला आहे.

अखिलेश याच शनी ग्रहाच्या बेचैनी मानसिकतेत त्यांच्या वय वर्ष 40 ला स्वतः ला पक्षाचे प्रमुखपदी स्थापित केले व वडील मुलायम सिंग यांच्याविरुद्ध बंड करून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष झाले. अखिलेश हे वयाच्या 38 व्या वर्षी मुखमंत्री झाले होते. त्यांना मुख्यमंत्री करण्यात मुलायम सिंग यांचा अंतिम निर्णय होता. अखिलेश यांनी समाजवादी पक्षाची सूत्रे हातात घेतल्यानंतर 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त 5 जागा मिळाल्या व पक्षाची लोकप्रियता कमी होत गेली. पुढे उत्तर प्रदेशची सत्ताही गेली. अखिलेश यांच्या हातावरील मस्तक रेषा हातावर सरळ न जाता बोटांकडे म्हणजेच बोटांखालील ग्रहांकडे व विशेषतः शनी ग्रहाकडे खेचली गेल्याने त्यांची भावना कायमची काळजी व असुरक्षित मानसिकता असल्याने त्यांचे निर्णय त्याच अस्वस्थ भावनेखाली अजून होत आहेत. असुरक्षित मानसिकते बरोबरच स्वार्थी भाव त्यांची हृदय रेषा वृद्धींगत करीत आहे. हृदय रेषा प्रेम, भावना, वात्सल्य, करुणा इत्यादी भावभावनां बरोबरच स्वार्थी भाव हि दाखविते. अखिलेश यांचा हातावरील हृदय रेषा गुरु ग्रहावरून पहिल्या बोटाच्या बाहेरील कडेपासून उगम पावत असून या हृदय रेषेने गुरु ग्रहाचा आकार सीमित केला आहे. अखिलेश यांच्या हातावरील हृदय रेषा मधल्या बोटाखाली म्हणजे शनी ग्रहापर्यंत पातळ आहे व तेथून पुढे हृदय रेषा जाड व पसरट झाल्याने स्वार्थी भाव अजून वाढीस लागला. हृदय रेषेचा उगम पहिल्या बोटाच्या पेराखाली किंवा गुरु ग्रहाच्या मध्य भागातून उगम पाऊन कमानदार होऊन करंगळीच्या बाहेर गेली असेल तर ती हृदय रेषा सात्विक प्रेमभावनेचे व वात्सल्यपूर्ण म्हणून ओळखली जाते. अखिलेश यांचे हातावरील गुरु ग्रहाचा आकार हृदय रेषेने सीमित केल्याने गुरु ग्रहाची शुभ गुणग्राहकता कमी झाली आहे. यात आज्ञापालन, धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, महत्वाकांक्षा, सत्ता, ऐहिक सुख, विद्यार्जन, ज्ञान, व्यासंग इत्यादी सत्वगुणांची कमतरता निर्माण झाली.

अखिलेश यांच्या हातावरील चंद्र ग्रह शुभकारक आहे. त्यामुळे त्यांच्या अंगी असलेल्या कल्पना, नियोजन उच्च प्रतीचे आहे. अंगठा मजबूत आहे. त्यामुळे एकाधिकारशाही व मी म्हणेल तो कायदाची वृत्ती आहे. कल्पना व नियोजन उत्तम असले तरी अंगठ्याच्या दुसर्‍या पेरावर मधोमध दोन आडव्या रेषा असल्याने कृती करण्यात घाई होते. साधक बाधक विचाराअंती निर्णय होत नाही. अखिलेश यांचे हातावर रवी रेषा आहे व ती वय वर्ष 35 पासून आहे. ती शुभकारक आहे, परंतु काही ठिकाणी अस्पष्ट व किंचित वळणदार असल्याने शुभ कारकत्वात न्यूनता आली आहे. अखिलेश यांच्या पत्नी खासदार आहेत, परंतु दोंघांच्या संसारात मधुरतेचा काहीसा अभाव आहे. अखिलेश यांच्या हातावरील विवाह रेषा हवी तितकी शुभकारक नाही. अखिलेश यांच्या हातावरील भाग्य रेषा वय वर्ष 60पर्यंतच शुभ आहे. उजव्या हातावरील बुध रेषा साधारण असून स्वतःला पुढे करण्याची क्षमता व युक्ति त्यांच्यात कमी आहे. अखिलेश यांचा राजकीय बालेकिल्ला मुखतः उत्तर प्रदेश आहे. बहुजन समाज व मुस्लिम बहुसंख्य मतदार असलेल्या प्रदेशात समाजवादी पक्षाचे प्रभुत्व आहे. अखिलेश इंडिया आघाडीत सामील झाले आहेत. येत्या लोक सभेच्या निवडणुकीत त्यांच्या वाट्याला किती जागा येतात व त्यातील किती निवडून येतील याचे भविष्य वर्तविणे अवघड आहे.

अखिलेश यांच्या डाव्या हातावर शुक्र, बुध योग हा बुध रेषेने घडवून आणला आहे. संचितामधेच अखिलेश याना ऐश्वर्य प्राप्त आहे व त्यामागे राजकीय कुटुंबाचे वारस असल्याने मानसन्मान व कीर्तीचा लाभ झाला आहे. परंतु संचिताचा डाव्या हातावरील भाग्य रेषा व रवी रेषा सामान्य आहे. आयुष्य रेषेतून एकच उत्कर्ष रेषा वय वर्ष 38 ला आहे व त्याच वर्षी अखिलेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. अखिलेश यांच्या डाव्या व उजव्या हातावरील ग्रह रेषांवरून अखिलेश राष्ट्रीय राजकारणात येण्याची शक्यता धूसर आहे. समाजवादी पक्षाकडे मध् प्रदेश व महाराष्ट्रात प्रत्येकी दोन आमदार आहेत आणि 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर एक आमदार आहे. मात्र येत्या काळात अखिलेश यांचे उत्तर प्रदेश या बालेकिल्यातच वर्चस्व राहणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या