Wednesday, January 7, 2026
HomeनगरAkole : अकोले शहराजवळ कारने दोघांना चिरडले; एकाचा मृत्यू

Akole : अकोले शहराजवळ कारने दोघांना चिरडले; एकाचा मृत्यू

पोलिसांनी चालक शिक्षकाला केली अटक

अकोले |प्रतिनिधी| Akole

बेदरकारपणे आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन चालवून रस्त्याने पायी जाणार्‍या दोघांना चिरडल्याची घटना नुकतीच अकोले शहराजवळ घडली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसर्‍याची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित वाहनचालक हा राजूर येथील एका प्रथितयश शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असून तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे समजते. या अपघातामध्ये पायी जाणारे दिलीप लक्ष्मण घुले (वय 58, रा. अकोले) यांचा मृत्यू झाला आहे. तर राजेंद्र लिंबा डोके (रा. खानापूर) हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की 27 ऑक्टोबर, 2025 रोजी सायंकाळी 7 ते 7.15 वाजेच्या दरम्यान शहराजवळ अकोले-देवठाण रस्त्यावर भरधाव वेगाने एक कार आली. या कारच्या मद्यधुंद चालकाने विठ्ठल लॉन्ससमोर एकाला व विघ्नहर्ता अ‍ॅग्रो दुकानासमोर एकाला अशा दोघांना उडवून देत पसार झाला होता. यात दिलीप घुले हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र डोके हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

YouTube video player

या घटनेनंतर मयताचा मुलगा अक्षय दिलीप घुले यांनी अकोले पोलिसांत फिर्याद देऊन सुरुवातीला अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज व इतर तपास केल्यानंतर ‘हिट अँड रन’च्या घटनेतील मद्यधुंद चालक हा राजूर येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षक असणारा श्रीकांत विष्णू घाणे हा असल्याचे संशयावरून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...