Wednesday, May 29, 2024
Homeनगरअकोलेत नव्याने 38 करोना बाधित

अकोलेत नव्याने 38 करोना बाधित

अकोले |प्रतिनिधी| Akole

तालुक्यात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काल शनिवारी अकोले तालुक्यात 38 व्यक्ती करोना बाधित आढळले आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1352 झाली आहे.

अहमदनगर येथील प्रयोगशाळेतील अहवाल आले असून यामध्ये कळस बुद्रुक येथील 48 वर्षीय महिला, 23 वर्षीय महिला, बहिरवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगा, अकोले शहरातील 40 वर्षीय पुरूष, सुगाव बुद्रुक येथील 40 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय तरुण, रुंभोडी येथील 67 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, रेडे येथील 67 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, कळस खुर्द येथील 29 वर्षीय पुरूष, धुमाळवाडी येथील 62 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, इंदोरी येथील 12 वर्षीय मुलगा, नवलेवाडी येथील 48 वर्षीय महिला अशा 17 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर दुपारी तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये हिवरगाव आंबरे येथील 04 वर्षीय मुलगा, राजूर येथील 62 वर्षीय पुरूष, 54 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवती, 11 वर्षीय युवती, 15 वर्षीय युवती, निंब्रळ येथील 34 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरूष, बहिरवाडी येथील 68 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, 18 वर्षीय तरूण, कळस येथील 65 वर्षीय महिला, कोतूळ येथील 43 वर्षीय महिला, वारंघुशी येथील 32 वर्षीय महिला अशा 18 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सायंकाळी पुन्हा अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात औरंगपूर येथील 37 वर्षीय पुरूष, शहरातील 47 वर्षीय महिला, नवलेवाडी येथील 48 वर्षीय महिला, अशा 03 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने काल दिवसभरात 38 व्यक्तींचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या