Wednesday, January 7, 2026
HomeनगरLeopard Attack : मध्यरात्री थरार! बिबट्याने घरात घुसून केला हल्ला, मायलेक जखमी

Leopard Attack : मध्यरात्री थरार! बिबट्याने घरात घुसून केला हल्ला, मायलेक जखमी

अकोले (प्रतिनिधी)

तालुक्यातील देवठाण गावातील काळे वस्तीवर भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या घरात घुसला व मायलेकावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. परंतु, दोन्ही मुलांच्या धाडसामुळे आई बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

किसनाबाई रामहरी काळे (वय ५७) व वैभव रामहरी काळे (वय २७) अशी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. देवठाण येथील पाटाच्या कडेला असणाऱ्या काळे वस्तीवरील घरात रात्री जेवणानंतर सर्वजण झोपलेले होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास मांजराच्या मागे बिबट्या लागला. तो दरवाजा तोडून थेट घरात गेला. दरवाजाचा आवाज आल्यामुळे किसनाबाई या उठल्या. त्यांनी बिबट्या पाहिल्यावर आरडाओरडा केला. त्यामुळे त्यांची मुले उठली. त्यांनी आई किसनाबाई यांच्यावर सुरू असणारा बिबट्याचा हल्ला परतवून लावला.

YouTube video player

पण बिबट्याचा पंजा लागल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. डोक्यातून मोठा रक्तस्राव होत होता. त्यांच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत तर वैभवच्या पाठीवर व हाताला बिबट्याचा दात लागल्याने तोही जखमी झाला आहे. या सर्व गोंधळात बिबट्या काही वेळ घरातील आतील खोलीमध्ये शिरला. नंतर त्याने तेथून अलगद पोबारा केला.

या घटनेची माहिती देवठाण गावचे माजी सरपंच अरुण शेळके यांना मिळताच त्यांनी अकोले वन विभागाचे धिंदळे यांना फोन केला. त्यांनी सहकाऱ्यांसह अर्ध्या तासात घटनास्थळी धाव घेतली. जखमींना प्रथमोपचारासाठी देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करुन नंतर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात येथे हलविले. तेथून अकोलेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. जखमींना मदत मिळावी व काळे वस्तीवर तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी देवठाण ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...