अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दि. 11 मार्च 2021 रोजी कांदा गोणी 914 आवक झाली.
- Advertisement -
या कांद्यास नं.1-1401 ते 1651 रुपये, नं.2 ला 1000 ते 1401 रुपये, नं.3 ला 600 ते 1000 रुपये, खाद 300 ते 600 रुपये प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत. अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लिलाव होत आहेत.
बाजार आवारात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच प्रत्येकाने हाताला सॅनेटाईज करणे, नाकाला व तोंडाला मास्क लावणे, बाजार आवारात कुणीही थुंकू नये, सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, उपसभापती भरत देशमाने, संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.