Saturday, July 27, 2024
Homeनगरअकोलेकरांनी अनुभवला आगळावेगळा स्नेह समारंभ

अकोलेकरांनी अनुभवला आगळावेगळा स्नेह समारंभ

अकोले | प्रतिनिधी

निमित्त होते ते तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांच्या बदलीचे. नोकरी म्हटली की बदली ही ठरलेली बाब. नोकरी करताना ते उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न बघता त्या जागेला न्याय देत समाजाप्रती आदराची, सहकार्याची भावना जपत काम करणारे फार थोडे अधिकारी असतात. त्यापैकीच एक असलेले अकोलेचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी. त्यांची नुकतीच शेजारील संगमनेर तालुक्यात बदली झाली. या बदलीची वार्ता जशी सामान्य शेतकरी आणि गावोगावी पोहोचली तसी सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली.

- Advertisement -

चकाचक निवारा पुन्हा हाती

अवघ्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये प्रवीण गोसावी यांनी पूर्ण तालुका आपला परिवार म्हणून जवळ केला. आणि या परिवारातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि सर्वांना सोबत घेत काम करण्याची पद्धती सर्वांना भावली. विशेष करून त्यांनी तालुक्यातील गरिबातील गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या बांधापर्यंत केलेला प्रवास सर्वांच्या हृदयात घर करून राहिला. गोसावी यांच्या माध्यमाने तालुक्यातील आदिवासीबहुल भागात केले गेलेले नाविन्यपूर्ण प्रयोग जसे की मसाले पिकांच्या लागवडी, आंबा, फणस, सुपारीच्या फळबाग लागवड, फुलशेतीला दिले प्राधान्य, भाजीपाला लागवड, यामध्ये शेतकऱ्यांची खराब बियाणे पुरवठा झाल्याने होणारे नुसकान व त्यावर शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेला लढा, तालुक्यातील पहिले बटाट्याचे उती संवर्धन केंद्र व त्या माध्यमाने बटाट्याची रोपे तयार करनारी पहिली रोपवाटिका त्यांनी निर्माण केली. ब्राह्मणवाडा सारख्या डोंगराळ भागातील बटाटा पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासन दरबारी मांडलेली बाजू व बटाटा बियाणे मध्ये झालेली फसवणूक यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने लढा दिला. असे अनेक प्रसंग सांगता येतील की ज्यामुळे लोकप्रिय झाले.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तालुक्यातील लहानात लहान शेतकरी गोसावी यांना नावानिशी ओळखतो. भौगोलिक दृष्ट्या अतिशय खडतर आणि अवघड असलेला हा तालुका एक हाती सांभाळताना त्यांनी अतिशय कष्ट घेतले. अकोले तालुक्यातील जनतेने सकाळी आठ वाजता कृषी कार्यालयात येणारा अधिकारी पहिल्यांदाच अनुभवला आहे. तालुका कृषी कार्यालयात जनसामान्य शेतकऱ्यांची होणारी गर्दी हे त्यांचे यश सांगून जाते. प्रयोगशीलता हा कामाचा अविभाज्य भाग ठेवून कायम सकारात्मक विचार करत आपल्या सहकार्‍यांमध्ये ही सरकार सकारात्मक विचारांचे बीजरोपण करत सर्वांनाच प्रत्यक्ष कृती करण्यास भाग पाडणारे अधिकारी म्हणून त्यांना तालुका कायम स्मरणात ठेवेल.

Gold Rate Today : सोने-चांदी घसरले, जाणून घ्या नवे दर ​

त्यांनी तालुक्यात शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमाने शेतकऱ्यांसाठी मोठे नेटवर्क उभे केले व त्या माध्यमाने शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. अशा या कार्यकर्तृत्व संपन्न गोसावी यांना निरोप देण्यासाठी अवघा तालुका सरसावला. अधिकारी वर्गही डोळ्यात पाणी आणून उभे राहिले. त्यांना निरोप देण्यासाठी स्नेह समारंभाचे आयोजन करण्यात आले. तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील मंडळी स्वयंस्फूर्तीने या कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखवून गेले. विशेष करून त्यांचे कर्मचारी वृंद आणि शेतकऱ्यांनी पुष्प वर्षाव करत केलेले स्वागत अविस्मरणीय राहिले.

सरतेशेवटी बदली म्हटल्यानंतर पाय काढावाच लागतो आणि त्याप्रमाणे गोसावी हे दुसऱ्या तालुक्यात आपले कार्य सुरू करतील. परंतु त्यांनी केलेले कार्य कायमस्वरूपी तमाम आदिवासी आणि गरीब शेतकऱ्यांच्या शेतावर उभे राहिलेले दिसेल. त्यांनी घालून दिलेला आदर्श व केलेले प्रयोग यापुढेही सातत्याने होत राहतील असेच आश्वासन तालुक्यातील जनतेला त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने द्यायचे आहे आणि तोच खरा त्यांना निरोप असेल. अशी त्यांची प्रांजळ भावना होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या