Friday, November 22, 2024
Homeनगरदेशी दारुच्या दुकानात चोरी करणारे आरोपी जेरबंद

देशी दारुच्या दुकानात चोरी करणारे आरोपी जेरबंद

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासा खुर्द येथील सरकारमान्य देशी दारू दुकानाच्या पाठीमागील बाजुचे शटरचे लॉक तोडून दुकानामध्ये प्रवेश करून एकूण 71 हजार रुपये किंमतीच्या देशी भिंगरी संत्रा व बॉबी दारुचे 23 बॉक्स चोरी करणार्‍या आरोपींना नेवासा पोलिसांनी 24 तासांत केले जेरबंद केले. दि. 07 जून रोजी रात्री नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा खुर्द येथील चंद्रशेखर नारायण व्यंकटरमण यांच्या सरकारमान्य देशी दारू दुकानाच्या पाठीमागील बाजुचे शटरचे लॉक तोडून दुकानामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी एकूण 71 हजार रुपये किंमतीच्या देशी भिंगरी, संत्रा व बॉबी दारुचे 23 बॉक्स चोरी केले. याबाबत नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एम. केदार हे करत होते.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तात्काळ पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एम. केदार, आप्पा तांबे, जी. ए. फाटक यांचे पथक तयार करुन पुढील तपास चालू केला. गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नेवासा खुर्द येथील सरकारमान्य देशी दुकानाचे मालक चंद्रशेखर नारायण व्यंकटरमण यांच्या कुकाणा गावातील सरकारमान्य देशी दुकानात कामाला असलेला बलराज राजेश्वर बिमागणी यानेच चोरी केल्याचे समजले, त्यानंतर तात्काळ पोलीस पथकाने कुकाणा येथील चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन तेथील कामगार बलराज बिमागणी यास विश्वासात घेऊन त्यांचेकडे चौकशी केली.

त्याने सांगितले की, नेवासा खुर्द येथील मित्र काणकराजू पोचायीह गोपारी (नेवासा खुर्द येथील देशी दारुच्या दुकानाचा मॅनेजर) याच्याकडून दुकानाच्या डुप्लीकेट चाव्या घेऊन मी दुकानाचे शटर खोलून दुकानातील देशी भिंगरी व बॉबी देशी दारूचे बॉक्स मित्र निलेश देशमुख याच्या टाटाजीपमध्ये चोरून नेवून माका येथील एका पत्राच्या शेडमध्ये ठेवलेले आहे. त्यांनतर तात्काळ पोलीस पथकाने माका येथील आरोपीने दाखविलेल्या पत्राचे शेडमध्ये जाऊन खात्री केली असता पत्र्याच्या शेडमध्ये 16 देशी दारुचे एकूण 16 बॉक्स 50 हजार 200 रुपये किंमतीचे हस्तगत केले.

तसेच गुन्ह्यात वापरलेले 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे चारचाकी मालवाहू वाहन असे एकूण 2 लाख 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी काणकराजू पोचायीह गोपारी व आरोपी बलराज राजेश्वर बिमागणी या दोघांनी संगनमत करून गुन्हा केल्याने त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या