Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमआळेफाटा परिसरात डिझेलची चोरी करणारी टोळी सक्रिय

आळेफाटा परिसरात डिझेलची चोरी करणारी टोळी सक्रिय

आळेफाटा |प्रतिनिधी| Alephata

आळेफाटा परिसरात मागच्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी गॅरेज समोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रक (Truck), टेम्पो (Tempo) व इतर वाहनांच्या डिझेल टाकीचे लॉक तोडून त्यातील डिझेल चोरीला (Diesel Theft) जाण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे त्रस्त झालेलेल्या गॅरेज चालकांनी चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

आळेफाटा परिसरात नगर-कल्याण (Nagar Kalyan Highway) आणि पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) मोठ्या प्रमाणात वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहेत. तर वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असून रात्रीच्या सुमारास गॅरेज समोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या ट्रक, टेम्पोे व इतर वाहनांचे डिझेल चोरीचे (Diesel Theft) प्रमाण वाढत असल्याने गॅरेज चालकांसह खरेदी विक्री करणारे व्यावसायिक त्रस्त झाले असून या डिझेल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता चोरट्यांनी आपला मोर्चा डिझेल चोरीकडे वळविला आहे. या सक्रिय टोळीने इंधन चोरीचा सपाटा लावल्याने वाहन मालकांमध्ये दहशत पसरली आहे.

दरम्यान मागील आठवड्यात कल्याण रोडवर उभ्या असलेल्या आठ वाहनांच्या डिझेलच्या टाकीचे लॉक तोडून त्यातील आडिशे लिटर डिझेल चोरीस गेले आहे. असे प्रकार रोजच घडत असल्याने या चोरांचा पोलिसांनी (Police) बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...