Friday, November 15, 2024
Homeनाशिकनऊ वर्षीय बालकाचे प्रसंगावधान; हल्ला करणाऱ्या बिबट्याला लावले पळवून

नऊ वर्षीय बालकाचे प्रसंगावधान; हल्ला करणाऱ्या बिबट्याला लावले पळवून

नाशिक रोड । प्रतिनिधी Nashikroad

पिंपळगाव खांब परिसरात आज दुपारी उघड्यावर शौचालयास गेलेल्या एका नऊ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या बालकाने प्रसंगावधान राखून बिबट्याला परतावून लावले मात्र किरकोळ प्रमाणात हा बालक जखमी झाला आहे.

- Advertisement -

अभिषेक सोमनाथ चारस्कर राहणार पिंपळगाव खांब हा नऊ वर्षाचा मुलगा दुपारी मोकळ्या जागेतील उघड्या जागेवर शौचालयास गेला असता अचानकपणे या ठिकाणी बिबट्या आला व अभिषेक याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात किरकोळ जखमी झाला असता सदर बिबट्या बालकाला उचलून नेण्याचा प्रयत्न करीत असताना या बालकाने शौचालयास आणलेला पाण्याचा डबा बिबट्याला फेकून मारला व आरडा ओरड केली असता गावातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावले परिणामी नागरिक आल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली.

दरम्यान बिबट्याच्या या हल्ल्यात अभिषेक हा किरकोळ जखमी झाला असून त्यानंतर तातडीने माजी नगरसेवक जगदीश पवार व गावातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या