Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमअलिबागच्या साईभक्तांना कोयत्याच्या धाकाने लुटले

अलिबागच्या साईभक्तांना कोयत्याच्या धाकाने लुटले

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

अलिबाग (जि. रायगड) तालुक्यातील रेवदंडा येथून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चारचाकी वाहनाने जात असलेल्या साईभक्तांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. निळवंडे ते शिर्डी रस्त्यावर कौठे कमळेश्वर (ता.संगमनेर) शिवारात शनिवारी पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

याबाबतची अधिक माहिती अशी, की रेवदंडा येथील प्रवीण नाईक, अभय ठाकूर, गणेश मेस्त्री, राजेंद्र ठाकूर, अजय चौलकर, जयेश कोडे, ऋषीकेश पडवळ हे साईभक्त शनिवारी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास काकडी विमानतळ मार्गे असलेल्या कौठे कमळेश्वर रस्त्याने प्रवास करीत असताना चार अज्ञात लुटारूंनी गाडी आडवी लावून अडविले. कोयत्याचा धाक दाखवून लुटारूंनी साईभक्तांच्या चारचाकी वाहनाचे लायसन्स, बॅच, आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड काढून घेतले. साईभक्तांची सोन्याची अंगठी, साखळी तसेच रोख रक्कम मिळून 93 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

दरम्यान साईभक्तांनी आपला जीव वाचविण्यासाठी चारचाकी कौठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांच्या वस्तीकडे नेली. तरीही लुटारु वस्तीकडे जावून कोयत्याचा धाक दाखवून धमकावत होते. यावेळी जोंधळे यांना आवाज आल्यानंतर ते बाहेर आले आणि त्यांनी साईभक्तांना वाचविले. त्यानंतर जोंधळे यांनी घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली. त्यावर पोलिसांनी घटनास्थळी येत माहिती घेतली. याप्रकरणी प्रवीण वसंत नाईक (वय 49, रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. के. मोकळ हे करीत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...