Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधमेरा भारत महाजन

मेरा भारत महाजन

– अलका दराडे

घराघरांतील संवादाला किती महत्त्व आहे हे वेगळे का सांगायला हवे? एक आई ते आजी या प्रवासात बदलत जाणारे संवादाचे टप्पे धुंडाळणारे सदर…

- Advertisement -

आपली भारतीय संस्कृती महान आहे. आपल्या मुलांवर आपण उत्तम संस्कार करत आहोत याचा तर आपल्याला अभिमानच वाटत आहे. अनेक विषयांमधे प्रगती करत आपली नजर धरणीमातेवरून अभिमानाने मुलांच्या चंदामामाकडे वळली आहे. नुकतेच 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी आपले भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे आनंदाचे क्षण टीव्हीवर पाहिले आहेत व त्यांनाही भारताच्या या सोनेरी यशाचे कौतुक वाटले आहे.

इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे सर्वच जण अभिनंदन करत आहेत. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आपण पाहिला. या शास्त्रज्ञांकडून आपली आताची पिढी मोलाचा संदेश घेईल व भारताची प्रगती अधिक करण्यासाठी त्यात भागही घेतील. आपला देश नेहमीच प्रगतीसाठी प्रोत्साहन देत आहे, ही कौतुकाची बाब आहे. हे क्षण सर्वच विद्यार्थी अगदी शाळेपासून तर कॅालेज जीवनातही लक्षात ठेवतील व आपल्या यशस्वी शास्त्रज्ञांच्या पावलांवर पाऊल टाकून सर्वांचीच प्रगती करतील. प्रत्येक घरातून या मुलांवर आशीर्वादाचे हात आहेत. आपण आपल्या मुलांना नेहमीच सकारात्मक गोष्टी करण्यास सांगतो व शिकवतो. आजही आपण अभिमानाने आपल्या सर्व पुढील पिढीला सांगूया, मुलांनो व मुलींनो, पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मुलांनी यशस्वीतेचे शिखर गाठावे असे कोणत्या पालकांना वाटणार नाही? हा विश्वास मुले नक्की तडीस नेतील. आपल्या पालकांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून, संपूर्ण भारतासाठी असणारे असे अभिमानाचे क्षण आपण प्रगतीच्या मार्गातून पुन्हा पुन्हा अनुभवू व देशाचे नाव जगाच्या नकाशात उज्ज्वल करूया.

भारत माता की जय या घोषणेबरोबर पुढे पुढे चालत राहू.

(क्रमश:)

- Advertisment -

ताज्या बातम्या