Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणुका पुढे ढकलल्या तरी चालेल पण ओबीसी आरक्षणावर तोडगा हवा

निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालेल पण ओबीसी आरक्षणावर तोडगा हवा

मुंबई :

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) कायम ठेवण्यावर सर्वपक्षीयांचं एकमत झालं असल्याची माहिती आहे. OBC आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज पार पडली. आता यासंदर्भात आता पुन्हा शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन केलं आहे. दरम्यान बैठकीनंतर बोलतांना नाशिकचे (nashik)पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal)यांनी सांगितले की, निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालेल पण ओबीस आरक्षणावर तोडगा हवा. तर ओबीसींच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (nana patole) दिली आहे.

- Advertisement -

दीड कोटी पगार असलेल्या अमिताभच्या बॉडीगार्डची बदली

ओबीसी आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीला राज ठाकरे अनुपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, (cm uddhav thackeray)उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar), मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. राजकीय आरक्षणामध्ये येणा-या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी विविध राजकीय पक्षांची मते समजून घेतली. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे ते म्हणाले. दरम्यान बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

बैठकीनंतर भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. काल कॅबिनेटमध्ये यावर चर्चा झाली. ही परिस्थिती सर्व पक्षांच्या नेत्यांच्या कानावर टाकलं पाहिजे म्हणून आजची बैठक झाली. निवडणुका पुढे ढकलल्या तरी चालेल पण यावर आधी तोडगा निघाला पाहिजे असं यावर सर्वांचं एकमत झालं. ५० टक्केच्या वरती जायचं ठरलं तर त्याला कोर्ट आणि इतर गोष्टी आहेत त्यामुळे जास्त वेळ जाऊ शकतो. आम्ही आता आरोप आणि प्रत्यारोप यावर बोलणार नाही तर कसा मार्ग काढायचा हे पाहत आहोत.

- Advertisment -

ताज्या बातम्या