Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शासकीय महामंडळांचे वाटप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शासकीय महामंडळांचे वाटप

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्यात अस्तित्वात असलेल्या विविध महामंडळाच्या वाटपाबाबत सध्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या महामंडळांच्या वाटपाची प्रकिया पूर्ण होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते सत्तेच्या पदापासून वंचित आहेत. अशा कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताकद देण्यासाठी महामंडळ वाटप होणे आवश्यक आहे. त्याबाबत महायुतीतील सर्वच पक्षात एकमत आहे. या महामंडळ वाटपाच्या दृष्टीने आतापर्यंत महायुतीतील घटक पक्षांच्या दोन बैठका पार पडल्या असून लवकरच त्याबाबत अंतिम निर्णय होईल, असे तटकरे यांनी सांगितले.

YouTube video player

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश भाजप नेतृत्वाच्या माध्यमातून झाल्याबाबतच्या चुकीच्या चर्चा प्रसारमाध्यमातून सुरु आहेत. मात्र भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय पूर्णपणे आमच्या पक्षाचा आहे. भुजबळ यांचा शपथविधी होण्याच्या एक आठवडा आधीच पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला होता, असा खुलासाही तटकरे यांनी केला.

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा – विभागीय आयुक्त...

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करीत पायाभूत सोयीसुविधांसह विकास कामांना गती द्यावी, असे निर्देश नाशिक...