Monday, May 5, 2025
Homeधुळेअसेही...अल्पवयीन मुलांनी चोरल्यात 12 विद्युत पंप

असेही…अल्पवयीन मुलांनी चोरल्यात 12 विद्युत पंप

धुळे । dhule । प्रतिनिधी

येथील शहर पोलिसांच्या शोध पथकाने मोठ्या शिताफिने इले. मोटारी (electric pumps)चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. या चोर्‍यांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा (minors stole) (विधीसंघर्ष बालक) सहभाग असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 92 हजारांच्या 12 मोटारी हस्तगत करण्यात आल्या.

- Advertisement -

साक्री रोडवरील संघमा चौकाजवळील दक्षता पोलीस हौंसिंग सोसायटीतील सार्वजनिक विहिरीवर बसवलेली साडेचार हजारांची इलेक्ट्रीक पाण्याची मोटार अज्ञात चोरटयाने दि. 13 रोजी चोरुन नेली होती. याबाबत परिसरात राहणारे उध्दव मधुकर वाघ (वय 45) यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान परिसरात यापुर्वी देखील पाण्याच्या इलेक्ट्रीक मोटार चोरी घटना घडल्याबाबत तक्रारी शहर पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोहेकॉ मंच्छिद्र पाटील व विजय शिरसाठ यांना सुचना व मार्गदर्शन केले.

त्यावरुन शोध पथकाने गोपनिय बातमीदारामार्फत माहीत काढली. या गुन्हयात तीन विधीसंघर्षीत अपचारी बालक निष्पन्न केले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयातील इलेक्ट्रीक पाण्याची मोटारसह इतर 11 मोटार काढून दिल्या. त्या त्यांनी दक्षता पोलीस सोसा, देवचंद नगर, कृषी नगर, उत्कर्ष कॉलनी परिसरातुन चोरलेल्याचे सांगितले. एकुण 92 हजार रुपये किंमतीच्या 12 मोटारी जप्त करण्यात आल्या आहे.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलिस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेंमत पाटील, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, शोध पथकाचे पोहेकाँ मच्छिंद्र पाटील, विजय शिरसाठ, पोना कुंदन पटाईत, पोकॉ निलेश पोतदार, महेश मोरे, गुणवंतराव पाटील, प्रसाद वाघ, मनिष सोनगिरे, प्रविण पाटील, शाकीर शेख, अविनाश कराड, तुषार मोरे, केतन पाटील यांच्या पथकाने केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : “काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करुन टाका”; चंद्रशेखर बावनकुळेंचा...

0
मुंबई | Mumbai राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना कार्यकर्त्यांना 'काँग्रेसला (Congress) फोडा आणि पक्ष रिकामा करा', असा...