Sunday, May 26, 2024
Homeनगरअंबड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

अंबड येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील अंबड येथील मुक्ताईवाडी येथे सर्वे नंबर 9 येथे राहत असलेल्या आदिवासी समाजाच्या बबाबाई बाळू मेंगाळ यांच्या गोठ्यातील गाभण शेळीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने पहाटेच्यावेळी हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

अंबडमध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून काही दिवसांपूर्वी गावठाण हद्दीत राहत असलेल्या मारूती हांडे यांच्या शेळीचा फडशा पाडला त्यानंतर साईनाथ नाईकवाडी यांच्या गोठ्या शेजारील गवतात दिवसभर धुमाकूळ घातला त्यामुळे शाळेचे विद्यार्थी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा शेतात काम करणार्‍या मजुरांना अनेक वेळा दर्शन घडले आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

ठार केलेल्या शेळीचा वनविभागाचे कर्मचारी एस. सी. काकड यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वनविभागाकडून सदर शेतकर्‍याला जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी गावचे माजी सरपंच दत्तू जाधव यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या