Thursday, March 27, 2025
Homeनगरअंभोरे येथे पाटात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

अंभोरे येथे पाटात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील अंभोरे येथे पाटाच्या पाण्यात पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. 20 मे) सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. राधाकृष्ण विठोबा खेमनर (वय 42, रा. अंभोरे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राधाकृष्ण खेमनर हे सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अंभोरे गावातील डिग्रस गावच्या रस्त्यालगत असलेल्या पाटामध्ये पुलाच्या कडेला मृतावस्थेत मिळून आले. या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तालुका पोलिसही घटनास्थळी आले होते. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मयत खेमनर यांना पाटातून वर काढत औषधोपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

मात्र औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.
याप्रकरणी दगडू खेमनर (रा. अंभोरे) यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एम. आर. सहाणे हे करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मेक इन इंडिया भारतीयत्वाचं ‘इमोशन’ !

0
अहिल्यानगर | Ahilyanagar| अनंत पाटील ‘मेक इन इंडिया’ ही भावना आहे, असे मी नेहमी मानतो. त्याकडे स्कीम म्हणून पाहू नये, ते एक प्रकारे भारतीयत्वाचं इमोशन...