Saturday, April 25, 2026
Homeदेश विदेशभारताचा तुर्कीला आणखी एक दणका; BCAS ने तुर्कीच्या ग्राउंड हँडलिंग कंपनी CELEBI...

भारताचा तुर्कीला आणखी एक दणका; BCAS ने तुर्कीच्या ग्राउंड हँडलिंग कंपनी CELEBI ची सुरक्षा मंजुरी केली रद्द

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मु काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या वेळी पाकिस्तानला सक्रीय पाठिंबा देणे तुक्री आणि अझरबैजानला महागात पडण्याची शक्यता आहे. या दोन्ही देशात जाणाऱ्या ६० टक्के भारतीय पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केली आहेत. तर दुसरीकडे मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये तुर्की आणि अझरबैजानमधून येणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावर #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan असा ट्रेन्ड सुरू आहे. त्यातच आता भारत सरकारच्या विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने मोठा निर्णय घेतला असून तुर्कीला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.

भारत सरकारच्या विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) ने सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

BCAS द्वारे CELEBI ची सुरक्षा मंजुरी रद्द करणे हे भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील कठोर सुरक्षा निरीक्षण आणि धोरण कठोरतेचे स्पष्ट संकेत आहे. आता विना व्यत्यय सेवा सुरू ठेवण्यासाठी तातडीने नवीन पर्याय शोधण्याचे आव्हान विमानतळ चालकांसमोर असणार आहे.

काय आहे सेलेबी एअरपोर्ट सर्विस?
CELEBI ही एक तुर्की कंपनी आहे जी भारतात ग्राउंड हँडलिंग सेवा प्रदान करते. ही कंपनी मुंबई, दिल्ली, हैदराबादसह अनेक प्रमुख विमानतळांवर बॅगेज हँडलिंग, रॅम्प सर्व्हिस, कार्गो हँडलिंग सारख्या सेवा देत आहे.

लोड कंट्रोल व फ्लाइट ऑपरेशन्स – विमानाचा समतोल योग्य राखण्यासाठी आवश्यक नियोजन.
ब्रिज ऑपरेशन्स – प्रवाशांना विमानात प्रवेश मिळवून देणाऱ्या ब्रिजेसचे संचालन.
प्रवासी, मालवाहतूक व पोस्टल सेवा, तसेच गोदाम व्यवस्थापन – हे क्षेत्र अत्यंत सुरक्षात्मक आहे, कारण येथे संवेदनशील वस्तूंची हालचाल व साठवणूक केली जाते.
जनरल एव्हिएशन, प्रीमीयम लाऊंज सेवा – यात खाजगी किंवा व्हीआयपी विमानांचे संचालन येते.

BCAS ने काय म्हटले
BCAS ने स्पष्टपणे सांगितले की हे पाऊल “राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने” उचलण्यात आले आहे. तथापि, सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती सार्वजनिक केलेली नाही.

या निर्णयाचा काय परिणाम होईल
सेलेबी यापुढे भारतातील कोणत्याही विमानतळावरील सुरक्षा-संवेदनशील भागात काम करू शकणार नाही. मुंबईसारख्या प्रमुख विमानतळांवर पर्यायी ग्राउंड हँडलिंग ऑपरेटरची आवश्यकता असू शकते. याचा विमान वाहतूक आणि विमानतळाच्या सामान्य कामकाजावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.

सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही
हा निर्णय सरकारच्या धोरणाचा पुनरुच्चार करतो की विमान वाहतूक क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षा सर्वोपरि आहे. परदेशी कंपन्यांना त्यांचे कामकाज कितीही मोठे असले तरी, सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन करणे देखील बंधनकारक आहे.

देशातील प्रमुख विमानतळावर CELEBI ची सेवा
कंपनी सध्या दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, गोवा (मोपा), कन्नूर आणि चेन्नई यासारख्या देशातील प्रमुख विमानतळांवर कार्यरत आहे. या सर्व विमानतळांचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेऊन, सरकारने त्यांच्या कारवायांची सखोल चौकशी सुरू केली आहे.

भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात असलेल्या कोणत्याही कृतीवर कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. काही खासदारांनी सरकारला पत्रे लिहून या संपूर्ण प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे आणि संसदेतही या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

धारणगाव खडकच्या भोंदूबाबाला पाच दिवसांची पोलीस कोठडी

0
शिरवाडे वाकद / लासलगाव | प्रतिनिधी Shirvade Vakad / Lasalgaon निफाड तालुयातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला लासलगाव पोलिसांनी मध्यरात्री...