Wednesday, February 4, 2026
Homeनगररुग्णवाहिकेची एसटी बसला धडक

रुग्णवाहिकेची एसटी बसला धडक

रुग्ण ठार तर चौघे जखमी || संगमनेरच्या कोकणगावची घटना

कोकणगाव |वार्ताहर| Kokangav

संगमनेर तालुक्यातील कोंची येथील अपघातातील जखमी रुग्णाला उपचारांसाठी घेऊन येणार्‍या रुग्णवाहिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये जखमी रुग्णाचा मृत्यू झाला तर इतर चौघे जखमी झाले आहेत. सदर भीषण अपघात कोकणगाव शिवारात रविवारी (दि. 26 मे) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडला आहे.

- Advertisement -

कोंची येथे दुचाकीचा अपघात होऊन बाळासाहेब धोंडीराम गिते (वय 55, रा. कोंची) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारार्थ हलवण्यासाठी संगमनेरातून रुग्णवाहिका बोलावली होती. सदर रुग्णवाहिका (क्र. एमएच.17, एजी.8002) जखमीला घेऊन संगमनेरला येत असताना कोकणगाव शिवारात हयगयीने वाहन चालवून बसला (क्र. एमएच.14, बीटी.380) समोरुन जोराची धडक दिली. यामध्ये जखमी रुग्ण बाळासाहेब गिते यांचा मृत्यू झाला तर गणेश लहानू गिते, संदीप भाऊसाहेब गिते, रुग्णवाहिका चालक व बसचालक किरकोळ जखमी झाले आहे.

YouTube video player

याप्रकरणी बसचालक सुनील शांतिलाल सोनवणे (वय 45, रा. सोयगाव, ता. मालेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुग्णवाहिका चालक सागर दगडू वाडेकर (रा. रायते वाघापूर, संगमनेर) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संपत जायभाये हे करत आहेत.

ताज्या बातम्या

शरद

Sharad Pawar: भारत-अमेरिका व्यापार करारावर शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले,...

0
बारामती | Baramatiबारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराबाबत सावधगिरीचा...