अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शनिवारी पाचव्या दिवशी 21 जणांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यात सर्वाधिक केडगाव उपनगरातील बुहूतांशी अपक्ष उमेदवार आहे. तर, सावेडीमधून माजी नगरसेवकांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरले आहेत.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व भरण्यास प्रारंभ झाला. 17 प्रभागातील इच्छुकांसाठी सहा ठिकाणी अर्ज भरण्याची व अर्ज खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिला अर्ज अॅड. धनंजय जाधव यांनी भरला होता. त्यानंतर चौथ्या दिवशी दहाजणांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यात माजी नगरसेवक महेश तवले, विजय पठारे व अमोल येवले, दिपाली बारस्कर यांचा समावेश होता.
अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी तब्बल 21 जणांनी अर्ज भरले. त्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, दिपाली बारस्कर, मीना चोपडा यांनी अर्ज भरले. केडगाव उपनगरातील सर्वाधिक अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. दरम्यान, आज रविवारी असल्याने सोमवारी अर्ज दाखल करण्यास प्रचंड गर्दी होणार आहे. कारण आतापर्यंत इच्छुकांनी 1 हजार 720 अर्ज नेले आहेत. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. 31 डिसेंबर रोजी छाननी होणार असून 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज माघार घेता येणार आहे.
आतापर्यंतची अर्ज विक्री
तहसील कार्यालय सावेडी 282, प्रभाग समिती एक सावेडी 307, भूसंपादन कार्यालय सावेडी 165, जुने मनपा कार्यालय 329, प्रभाग समिती 4, बुरूडगाव 301, केडगाव उपकार्यालय 336 यांचा समावेश आहे.




