Monday, April 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला.

- Advertisement -

गुन्हे शाखा युनिट २ चे हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी व पोलीस अंमलदार प्रविण वानखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राधेश्याम चौधरी नावाचा व्यक्ती चोरीचा (Thief) मोबाईल विक्रीसाठी पाथर्डी फाटा परिसरात येणार आहे. त्यांनी ही माहिती प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दामोदरनगर ते गौळाणे रस्त्यालगत दोस्ती चिकन सेंटरसमोर सापळा लावून राधेश्याम भगवान चौधरी (वय २९, रा. अंबड) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सॅमसंग कंपनीचा सुमारे ८० हजार रुपये किमतीचा मोबाईल पंचासमक्ष जप्त केला.

चौकशीत त्याने १० ते १२ दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा येथील रिलायन्स मॉलमधून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला, त्याला मुद्देमालासह इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी गुन्हेशाखा युनिट २ चे हेमंत तोडकर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोलिस अंमलदार प्रविण वानखेडे, तेजस मते, महेश खांडबहाले, सुनिल खैरनार आदींनी केली.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...