Saturday, January 24, 2026
HomeनगरAMC Election : महापालिका निवडणुकीचे 788 पैकी 17 अर्ज बाद

AMC Election : महापालिका निवडणुकीचे 788 पैकी 17 अर्ज बाद

एबी फॉर्मवरील खाडाखोड, चुकीच्या सह्या व झेरॉक्समुळे कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील 68 जागांसाठी इच्छुक उमेदवारांनी तब्बल 788 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी विविध ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत 788 पैकी 17 उमेदवारी अर्ज अवैध ठरवत बाद करण्यात आले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, अर्ज छाननीदरम्यान एबी फॉर्मवर खाडाखोड, अनुमोदकांच्या सह्या चुकीच्या असणे, एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडणे, तसेच काही प्रकरणांत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याचे प्रकार समोर आले. या त्रुटींमुळे संबंधित उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. महापालिकेच्या 68 जागांसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, एमआयएम, आम आदमी पार्टी, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तहसील कार्यालय सावेडी, प्रभाग समिती क्रमांक 1 सावेडी, भूसंपादन कार्यालय सावेडी, जुने महापालिका कार्यालय, प्रभाग समिती क्रमांक 4 बुरुडगाव तसेच केडगाव उपकार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसमोर उमेदवार, सूचक व अनुमोदकांच्या उपस्थितीत अर्जांची छाननी करण्यात आली.

YouTube video player

दरम्यान, विविध प्रभागांमध्ये उमेदवारांच्या अर्जांवर हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. अतिक्रमण, महापालिकेची करथकबाकी, एबी फॉर्मवरील खडाखोड, सह्या चुकीच्या असणे अशा स्वरूपाच्या हरकतींची दुपारी सुनावणी घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सुनावणीनंतर बहुतांश हरकती निकाली काढल्या. छाननीअंती शिवसेनेच्या पाच उमेदवारांचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. शिवसेनेच्या काही उमेदवारांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देण्यात आल्याने एबी फॉर्मवर व्हाईटनरचा वापर, खडाखोड व झेरॉक्स प्रती सादर केल्याचे आढळून आले. मात्र, संबंधित उमेदवारांचे अपक्ष अर्ज ग्राह्य धरण्यात आले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. आता 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार असून, त्यानंतरच प्रत्येक प्रभागातील निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...