Tuesday, January 20, 2026
HomeनगरAMC : अहिल्यानगरच्या महापौर आरक्षणाबाबत उत्सुकता

AMC : अहिल्यानगरच्या महापौर आरक्षणाबाबत उत्सुकता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिका निवडणूक होऊन निकाल जाहीर होऊनही अद्याप महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नसल्याने नामांतरानंतरच्या अहिल्यानगर शहराच्या पहिल्या महापौराबाबत उत्सुकता कायम आहे. मात्र, ही प्रतीक्षा आता संपणार असून येत्या गुरूवारी (22 जानेवारी) अहिल्यानगर महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे नामांतरानंतरच्या अहिल्यानगर महापालिकेचा पहिला महापौर कोण होणार, याचा अंदाज गुरूवारीच येणार आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या असून भाजपने 25, तर शिंदेसेनेने 10 जागा मिळवल्या आहेत. याशिवाय काँग्रेस आणि एमआयएम यांनी प्रत्येकी दोन, तर ठाकरे सेना आणि बसप यांनी प्रत्येकी एक जागा मिळवली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांना मिळून एकूण 52 जागा आल्याने महापालिकेतील सत्तेचे गणित स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक जागा मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदावर दावा केला जात आहे. मात्र, महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होते, यावर अंतिम निर्णय अवलंबून राहणार आहे. आरक्षणाच्या स्वरूपानुसार संबंधित प्रवर्गातील पात्र उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहेत, यावर महापौरपद कोणाच्या वाट्याला येणार, हे युतीत ठरणार आहे.

YouTube video player

यापूर्वी महापालिका निवडणुकीपूर्वीच महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जात होती. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून संभाव्य महापौर उमेदवार आधीच निश्चित केला जात असे. मात्र, यंदा प्रथमच निवडणूक होऊन निकाल जाहीर झाला असतानाही महापौरपदाचे आरक्षण काढण्यात आले नव्हते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आता गुरूवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. अहिल्यानगर महापालिकेत भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीला बहुमत मिळाले आहे. सर्वाधिक 27 नगरसेवक निवडूण आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापौरपद जाण्याची चर्चा आहे. मात्र, आरक्षण कोणत्या प्रवर्गाला निघते, यावरच महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, हे स्पष्ट होणार आहे. सध्या विविध नावे चर्चेत असून गुरूवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर-मनमाड रोडवर वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी आता होमगार्ड

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर- मनमाड या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर जिल्हा प्रशासनाने होमगार्ड नियुक्तीसाठी...