Tuesday, February 3, 2026
HomeनगरAMC Election : प्रचार रणसंग्राम संपला, उद्या मतदान

AMC Election : प्रचार रणसंग्राम संपला, उद्या मतदान

345 मतदान केंद्रांवर प्रशासन सज्ज

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (गुरूवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ही प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. शहरातील 70 शाळांमध्ये एकूण 345 मतदान केंद्रे उभारण्यात आली असून, त्यामध्ये एक पिंक मतदान केंद्र व दोन मॉडेल मतदान केंद्रांचा समावेश आहे. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांनी केले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता झाली असून, आता उमेदवारांकडून छुप्या पध्दतीने प्रचारावर भर दिला जाणार आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर महापालिकेत तब्बल दोन वर्षांच्या प्रशासकराज्यानंतर आता कार्यकारी मंडळासाठी मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. शहरातील 345 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यासाठी सुमारे दोन हजार 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर आरोग्य पथकांची नेमणूक करण्यात आली असून, महावितरणचा एक कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा तसेच सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी पुन्हा केले आहे.

YouTube video player

महापालिका हद्दीतील काही मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सात मतदान केंद्रांवर निवडणूक प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार असून, त्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सहा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयातून आज ईव्हीएम मशिन्स व इतर साहित्याचे वाटप होणार असून, यासाठी 80 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल फोन नेण्यास बंदी घालण्यात आली असून, तशा स्पष्ट सूचना निवडणूक प्रशासनाने दिल्या आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन येणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचार्‍यांसाठी जेवण, नाश्ता व निवासाची योग्य व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.

या मतदान केंद्रांवर राहणार विशेष लक्ष
जिल्हा परिषद उर्दू शाळा, दर्गा दायरा, मुकुंदनगर, मौलाना आझाद उर्दू शाळा, मुकुंदनगर, पेमराज सारडा कॉलेज, पत्रकार चौक, राधाबाई काळे महाविद्यालय, तारकपूर, मनपा उर्दू व मराठी शाळा, बेलदार गल्ली, नागोरी मिसगर उर्दू प्राथमिक शाळा, बेलदार गल्ली, सीताराम सारडा शाळा, बागडपट्टी.

दोन मॉडेल मतदान केंद्र
सावेडी उपनगरातील साई इंग्लिश मीडियम स्कूल, गावडे मळा येथे पिंक मतदान केंद्र राहणार असून, सावेडी गाव व रेल्वे स्टेशन परिसरात दोन मॉडेल मतदान केंद्रे असणार आहेत. या मॉडेल मतदान केंद्रांवर मतदारांचे स्वागत करण्यात येणार असून, मतदानासाठी येणार्‍या नागरिकांना आवश्यक सहाय्य दिले जाणार आहे. यासाठी एनएसएस व एनसीसीचे स्वयंसेवक सेवा देणार आहेत. तसेच मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

675 पोस्टल मतदान
अहिल्यानगर महापालिकेसाठी सहा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षामध्ये पोस्टल मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मंगळवारी (13 जानेवारी) दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली. सहा निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षात 750 पैकी 675 कर्मचार्‍यांनी मतदानाचा हक्क बजावला. उर्वरित कर्मचारी आज (बुधवारी) मतदान करू शकतात, असे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

श्रीनावास

Ajit Pawar Death: अजितदादांचे कोणतेही धार्मिक विधी होणार नाही; भाऊ श्रीनावास...

0
बारामती | Baramatiमहाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरच्या धार्मिक विधींबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. येत्या ६ जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे...