Tuesday, February 3, 2026
HomeनगरAMC Election : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज !

AMC Election : मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज !

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी (15 जानेवारी) किरकोळ वाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 63 जागांसाठी रिंगणात असलेल्या 283 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले असून आज, शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

- Advertisement -

नागापूर एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये स्ट्राँग रूम तयार करण्यात आली असून मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीनी येथे रात्री उशिरा सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. आज (शुक्रवार) सकाळी 9.30 वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने, निवडणूक निरीक्षक श्रीमंत हारकर आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या समक्ष स्ट्राँग रूम उघडण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 68 मतमोजणी पर्यवेक्षक व 68 मतमोजणी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

YouTube video player

सकाळी 10 वाजता सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. शहरातील सर्व 17 प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. प्रत्येक प्रभागासाठी टपाली मतदानासाठी एक टेबल तर ईव्हीएम मशीनसाठी तीन टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार टपाली मतदानासाठी 17 टेबल व ईव्हीएमसाठी 51 टेबल, अशा एकूण 68 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार सकाळी साडेअकरापर्यंत पहिल्या फेरीचा कल स्पष्ट होण्याची शक्यता असून दुपारी 1 वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तासह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

शेअर

India-US Trade Deal: टॅरिफ कमी होताच भारतीय शेअर बाजारात हिरवाई; सेन्सेक्स,...

0
मुंबई | Mumbaiभारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापारी करारामुळे आज भारतीय शेअर बाजाराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय...