Tuesday, May 20, 2025
HomeनगरAMC : अनधिकृत केबल हटवा, अन्यथा कारवाई

AMC : अनधिकृत केबल हटवा, अन्यथा कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

महानगरपालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल, तसेच इतर वाहिन्या संबंधितांनी तत्काळ काढून घ्याव्यात. महानगरपालिकेने विनापरवाना केबल टाकणार्‍या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना केबल तोडून हटवण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी तात्काळ अनधिकृत केबल काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

शहरात सर्वत्र महानगरपालिकेचे पथदिव्यांचे खांब आहेत. शहरातील जाणार्‍या प्रमुख रस्ते व महामार्गांवरही पथदिव्यांचे खांब आहेत. अनेक टीव्ही केबल कंपन्या व इंटरनेट सेवा पुरवणार्‍या कंपन्यांकडून त्यांच्या केबल टाकण्यासाठी बेकायदेशीरपणे महानगरपालिकेच्या खांबांचा वापर केला जात आहे. सदर खांबांवरून महानगरपालिकेच्या पथदिव्यांच्या वीज वाहक तारा टाकलेल्या असतात. त्याच ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता धोकादायक पध्दतीने या केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादा अपघात किंवा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पथदिव्यांच्या खांबांवरून या केबल हटवणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील सर्व टीव्ही व इंटरनेट केबल टाकणार्‍या कंपन्यांनी तात्काळ सदरच्या केबल काढून घ्याव्यात.

महानगरपालिकेने अशा केबल हटवण्यासाठी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या केबल कट करून काढण्यात येत आहेत. या कारवाईमुळे कोणतीही सेवा विखंडित झाल्यास, यामुळे कोणत्याही प्रकारचे व कोणाचेही नुकसान झाल्यास त्याला महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. ज्या केबल चालकांना अथवा इंटरनेट कंपन्यांना केबल टाकायच्या असतील, त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करून परवानगी घ्यावी व निश्चित करून दिलेल्या जागांवरूनच केबल टाकण्यात यावी. अन्यथा महानगरपालिका संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करेल. तसेच दंड ही आकारण्यात येईल व केबलही तोडून टाकण्यात येतील, असा इशारा डांगे यांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिंगवेनाईक शिवारातील हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा; दोन महिलांची सुटका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर-मनमाड मार्गावरील शिंगवेनाईक (ता. अहिल्यानगर) गावातील हॉटेल दोस्ती येथे अनैतिक मानवी व्यापार (कुंटणखाना) चालविल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी...