Tuesday, February 3, 2026
HomeनगरAMC : 32 हजार मालमत्ताधारकांनी भरला कर

AMC : 32 हजार मालमत्ताधारकांनी भरला कर

10 टक्के सवलतीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप करण्यात आले आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर 10 टक्के सवलत दिली जाते. मात्र, यंदा 31 मेपर्यंत सर्वसाधारण करावरील 10 टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. शहरातील 31 हजार 727 मालमत्ताधारकांनी याचा लाभ घेऊन कर भरला आहे. सवलतीसाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिले असून, नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीला मागील आर्थिक वर्षात नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी वसुली झाली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 140 अ नुसार करात एप्रिलमध्ये 10 टक्के, मे व जूनमध्ये 8 टक्के अशी सर्वसाधारण करात सूट दिली जाते. या वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरानुसार बिले वाटप करण्यासाठी काही प्रमाणात विलंब झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात दिली जाणारी 10 टक्के सवलत अनेकांना मिळू शकली नाही. नवीन दरानुसार बिलांचे वाटप केल्याने काहींना उशिरा बिले मिळाली. त्यामुळे नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातही 10 टक्के सवलत सर्वसाधारण करावर देण्यात आली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

शेअर

India-US Trade Deal: टॅरिफ कमी होताच भारतीय शेअर बाजारात हिरवाई; सेन्सेक्स,...

0
मुंबई | Mumbaiभारत आणि अमेरिका यांच्यातील ऐतिहासिक व्यापारी करारामुळे आज भारतीय शेअर बाजाराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय...