Thursday, January 8, 2026
HomeनगरAMC : नगररचनाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची आयुक्तांकडून कानउघाडणी

AMC : नगररचनाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची आयुक्तांकडून कानउघाडणी

छाननीनंतर ऑनलाईन फाईल दाखल करून घेण्याच्या सूचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

बांधकाम परवानगीसह सर्व प्रकरणांची ऑनलाईन फाईल दाखल होण्यापूर्वी त्याची छाननी करून घ्यावी. ऑनलाईन फाईल दाखल होण्यापूर्वीच त्रुटी दूर करून घेतल्यास पोर्टलवर फाईल प्रलंबित राहणार नाही, अशा सक्त सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी नगररचना विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. दरम्यान, प्रलंबित असलेल्या प्रकरणांबाबत जाब विचारून त्यांची कानउघाडणीही त्यांनी केली. नागरिकांनीही ऑनलाईन फाईल दाखल करून घेण्यापूर्वी त्याची छाननी करून घ्यावी, जेणेकरून त्रुटी विरहीत फाईल दाखल होईल व ती प्रलंबित राहणार नाही, असेही आयुक्त डांगे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत नगररचना विभागाच्या कारभारविरोधात तक्रार केली होती. त्याची दखल घेत आयुक्त डांगे यांनी गुरूवारी तत्काळ नगररचना विभागाच्या कामकाजाचा व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. पोर्टलवर शंभरहून अधिक विविध प्रकारची प्रकरणे प्रलंबित दिसत आहेत. त्यातील बहुतांशी प्रकरणे ऑफलाईन मंजूर झाली आहेत. तसेच, काही प्रकरणांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत. त्याची पूर्तता संबंधितांनी केलेली नाही. त्यामुळे ही प्रकरणे प्रलंबित आहेत. सद्यस्थितीत 40 ते 50 प्रकरणे प्रलंबित असून, त्याच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे डांगे यांनी सांगितले.

YouTube video player

पोर्टलवर प्रलंबित दिसणार्‍या प्रकरणांची तपासणी करावी. जी ऑफलाईन मंजूर आहेत, ती प्रकरणे पोर्टलवर प्रलंबित दिसणार नाहीत, याची खातरजमा करावी. त्रुटींची पूर्तता संबंधितांकडून होत नसेल तर ती प्रकरणे मुदत संपल्यावर नामंजूर करावीत. कोणत्याही परिस्थितीत मुदतीतच परवानग्या दिल्या जातील, याची दक्षता घ्यावी. त्यासाठी ऑफलाईन छाननी करून मगच ते ऑनलाईन दाखल होतील, याची दक्षता घ्यावी. प्रकरणे प्रलंबित दिसल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डांगे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रिव्हॉल्वर हलगर्जीपणे हाताळल्याचा ठपका; दोन पोलीस अंमलदार निलंबित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना सुरक्षा देणारे दोन पोलीस बॉडीगार्ड कर्तव्यात कसूर व शस्त्र हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहेत....