Wednesday, January 7, 2026
HomeनगरAMC : प्रारूप यादीवरील हरकतींसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

AMC : प्रारूप यादीवरील हरकतींसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

‘ब’ नमुना अर्जाव्दारे हरकत घेण्याचे आवाहन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर आलेल्या हरकतींवर पडताळणी करून व स्थळ पाहणी करून निर्णय घेतला जात आहे. मात्र, प्रक्रियेबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवून चुकीच्या मागण्या केल्या जात आहेत. मतदार यादीतील नावाबाबत हरकती दाखल करण्यासाठी मतदार व तक्रारदारांसाठी स्वतंत्र अर्ज आहेत. ज्या तक्रारदारांना हरकत घ्यायची असेल त्यांनी ब नमुना अर्जाव्दारे हरकत दाखल करावी. तसेच, हरकती दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 3 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या कामासाठी कोणत्याही खासगी व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबाबत होत असलेले आरोप खोटे व अफवा पसरवणारे आहेत. हरकती दाखल करण्यासाठीचे मतदार व तक्रारदारांचे स्वतंत्र अर्ज, हरकती कोठे जमा करायच्या याची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचावी यासाठी अधिकृतपणे संकेतस्थळावर, तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रारूप मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी मतदार व तक्रारदारांसाठी उपलब्ध असलेल्या अर्जानुसार हरकती दाखल कराव्यात. मोघम स्वरूपाच्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असेही डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

YouTube video player

राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हरकती दाखल करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यावर निर्णय होऊन 10 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच, 15 डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर, 22 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...