Tuesday, February 3, 2026
HomeनगरAMC : मतदार यादीचे काम कर्मचार्‍यांमार्फतच सुरू

AMC : मतदार यादीचे काम कर्मचार्‍यांमार्फतच सुरू

खोटी माहिती पसरवल्यास कारवाईचा आयुक्तांचा इशारा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीचे काम महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांमार्फतच सुरू आहे. विधानसभा मतदारसंघाच्या यादीची मूळ पीडीएफ कॉपी महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याची प्रिंट खासगी झेरॉक्स सेंटरवरून काढण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्याला अथवा बाहेरील व्यक्तीला यादीचे काम देण्यात आलेले नाही. नागरिकांनी कोणतीही चुकीची माहिती, अफवा पसरवू नये. कोणतीही माहिती खात्री किंवा पडताळणी केल्याशिवाय प्रसिद्ध करू नये, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

- Advertisement -

तसेच, मतदार यादी संदर्भात चुकीची माहिती पुरवणार्‍या नितीन भुतारे यांच्यावर महानगरपालिकेकडून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अहिल्यानगर शहरातील समाजमाध्यमावर मतदार यादीचे काम एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍याला दिल्याची खोटी माहिती प्रसिद्ध केली जात आहे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. महानगरपालिकेला विधानसभेची 1 जुलैची मूळ मतदार यादीची सॉफ्ट कॉपी प्राप्त झाली होती. ती खाजगी झेरॉक्स सेंटरवरून प्रिंट काढून घेतलेली आहे. महानगरपालिका कर्मचारी प्रत्यक्ष स्थळपाहणी करून प्रभागनिहाय मतदार याद्या फोडण्याचे काम करत आहेत. त्यानुसार कंट्रोल चार्ट भरल्यानंतर निवडणूक आयोगाकडील सॉफ्टवेअरमधून प्रारूप याद्या तयार होणार आहेत.

YouTube video player

त्या प्रारूप याद्या 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करून हरकती मागवण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत विधानसभेची मूळ मतदार यादीची प्रिंट काढण्याव्यतिरिक्त खाजगी व्यक्तींकडून कोणतेही काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. राजकीय पदाधिकार्‍यांमार्फत काम सुरू असल्याचे वृत्त चुकीचे आहे. माध्यमांनी निवडणुकीशी संबंधित वृत्त प्रसिद्ध करताना अधिकृत माहिती घेऊन, माहितीची पडताळणी करून प्रसिद्ध करावे. नागरिकांनी चुकीची माहिती किंवा अफवा पसरवू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही डांगे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Mayor Election : नाशकात महापौर, उपमहापौरपदासाठी चुरस वाढली; ठाकरेंच्या शिवसेनेसह...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिकेच्या महापौरपदासाठी (Mayor Post) शुक्रवार (दि.६) रोजी निवडणूक पार पडणार आहे. भाजपचे सर्वाधिक ७२ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर...