नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (America President Donald Trump) यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये (White House) दिवाळी साजरी केली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत (PM Narendra Modi) माझं फोनवर बोलणं झालं असं सांगितलं. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (America President Donald Trump) असे म्हणाले की, मी भारतीयांना दिवाळीच्या (Dipawali) हार्दिक शुभेच्छा देतो. मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. आमची खूप चांगली चर्चा झाली. आम्ही व्यापाराबद्दल बोललो असा ट्रम्प यांनी दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत प्रामुख्याने व्यापाराच्या मुद्यावर चर्चा झाल्याच ट्रम्प म्हणाले. आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा केली. पण जास्त करुन व्यापारी विषयावर बोललो. भविष्यात भारत रशियाकडून (Russia) मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणार नाही असा मोठा दावा सुद्धा ट्रम्प यांनी केला. व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प पत्रकारांशी बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रतिक्रीया दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक्स या सोशल मिडीयावर (Social Media) पोस्टमध्ये म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत फोनवर बोलणं झाल्याच सांगितलं. तुमचा फोन कॉल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांसाठी धन्यवाद असं पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रपती ट्रम्प तुमचा फोन कॉल आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छांसाठी खूप-खूप धन्यवाद. या प्रकाशोत्सवात आपल्या दोन महान लोकशाहींनी जगाला आशेच किरण दाखवला. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आपल्याला एकजूट रहावं लागेल असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मिडिया एक्सवर म्हणाले.
याआधी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी प्रकाशोत्सवाच्या सोमवारी शुभेच्छा दिल्या. कुटुंब आणि मित्र परिवाराने एकत्र येऊन सेलिब्रेट करण्याची ही वेळ आहे. ट्रम्प आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हणाले की, आज प्रकाश पर्व दिवाळी आहे. हा सण साजरा करणार्या अमेरिकी नागरिकांना मी शुभेच्छा देतो. असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.




