Monday, October 14, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAmit Shah : राज्यात महायुतीचेच सरकार आणू; CM एकनाथ शिंदेंचा शहांना शब्द,...

Amit Shah : राज्यात महायुतीचेच सरकार आणू; CM एकनाथ शिंदेंचा शहांना शब्द, रात्री झालेल्या बैठकीत काय घडलं

मुंबई | Mumbai
आगामी विधानसभा निवडणुकांची रणनिती, महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तसेच घटक पक्षांमधील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कंबर कसली आहे. दोन दिवसांपासून अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी भाजप नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यात देखील बैठकीत मंगळवारी रात्री जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात महायुतीचेच सरकार येणार- एकनाथ शिंदे
मंगळवारी रात्री सह्याद्री अतिथी गृहावर केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात महायुतीचेच सरकार आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना दिल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागावाटप करायला आणि उमेदवारांची नावे घोषित करायला उशीर करायला नको, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना केली. तसेच जागावाटप लवकरच जाहीर करायला हवे, अशी मागणीही एकनाथ शिंदे यांनी केली.

- Advertisement -

तसेच एकनाथ शिंदे यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या जागा आणि त्या जागा का हवे आहेत याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना दिली. शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजना या लोकांपर्यंत उत्तमरित्या पोहोचले आहेत यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितल्याचेही समोर आले आहे.

जागावाटपाच्या विषयावर आपण सर्व समन्वयाने मार्ग काढू, अशी अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्वाही दिल्याचे समजते. महायुतीमध्ये विसंवाद आहे, अशी भावना लोकांसमोर येऊन देऊ नका. आपापसातील मतभेद विसरून कुटुंबाप्रमाणे महायुती म्हणून एकत्र या आणि एकत्र लढा, असा सल्ला अमित शाहांनी शिंदे यांना दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या