Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार - अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार – अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

पुणे | Pune

लोकसभेनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर भाजपचे (BJP) पुण्यातील बालेवाडीत राज्यातील पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजपचे विधानसभेचे बिगुल वाजवले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी, देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय – बावनकुळे

YouTube video player

यावेळी बोलतांना शाह म्हणाले की, जेव्हा शरद पवारांचे (Sharad Pawar) सरकार महाराष्ट्रात सत्तेत येते, तेव्हा मराठा आरक्षण (Maratha Reservation) जाते. तर भाजप सरकार आल्यावर मराठा आरक्षण मिळते. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा शरद पवारांचे सरकार आले तर मराठा समाजाला मिळालेले आरक्षण जाईल. शरद पवार सत्तेत असतांना महाराष्ट्राला काहीही मिळालेले नसून देशातील राजकारणाच्या भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार हे शरद पवार आहेत, अशी टीका शाह यांनी केली.

हे देखील वाचा : मैदानात उतरा आणि ठोका, अट फक्त एकच…; फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना ‘फ्री हँड’

पुढे बोलतांना अमित शाह म्हणाले की, महाराष्ट्र, हरियाणा जिंकल्यावर राहुल गांधींचा (Rahul Gandhi) अहंकार मोडणार आहे. काँग्रेसने (Congress) कधीही दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. महाराष्ट्रात अनेक योजना भाजपने आणल्या आहेत. समाजातील प्रत्येक वर्गासाठी आम्ही काम केले आहे. गेल्या १० वर्षांत मोदींनी महाराष्ट्राला १० लाख ५ हजार कोटी दिले आहेत. त्यामुळे देशात पुढील ३० वर्ष मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार असणार असून महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदेशीर असेल, असेही शाह यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...