Friday, July 5, 2024
Homeराजकीय"वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला, मुलाला…"; पुतण्याचा काकावर पलटवार

“वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला, मुलाला…”; पुतण्याचा काकावर पलटवार

मुंबई । Mumbai

- Advertisement -

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरेंचं (Raj Thackeray) नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिला.

बिनशर्त पाठिंबा दिल्याची खिल्ली उद्ध ठाकरेंनी ‘बिनशर्ट’ पाठिंबा असं म्हणत उडवली. या टीकेनंतर मनसे चांगलीच आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. आता तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अमित ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंचा विनोद मला कळायलाही दहा मिनिटं लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी तो घेतला आणि मुलाला आमदार केलं. या गोष्टी विसरायला नकोत.

राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे तो स्वतःच्या मेहनतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनीतवर काढलेला पक्ष आहे हे कुणी विसरु नये. विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

या निवडणुकीमुळे एक गोष्ट बरी झाली. आपलं कोण आणि परकं कोण? मित्र कोण आणि शत्रू कोण? हे स्पष्ट झालं. काही जणांनी उद्धव ठाकरे नको म्हणून पंतप्रधान मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे, बिनशर्ट पाठिंबा दिला ना. उद्धव ठाकरे नको, हा बघा मी शर्ट काढला आहे. उघड पाठिंबा देत आहे. काही जणांना नाटक करण्यासाठी पाठिंबा दिला, असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या