मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांना फॉलो करणारे अनेक चाहते आहेत. मात्र काल त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चाना उधाण आलं.
अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे लवकरच लग्न करणार अशी बातमी छापलेली एक पोस्ट त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ही पोस्ट बघून सर्वच चकित होत आहेत. परंतु यामागील नेमकी स्टोरी काय आहे ते पाहूया..
इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव! विहीर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत ३५ जणांनी गमावला जीव
अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्रामधील बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे लवकरच लग्न होणार आहे, असं त्या बातमीमध्ये लिहिलं आहे.
या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज १ एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!’ अमोल कोल्हे यांच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत.
साईबाबांवरील प्रश्नावर बागेश्वर बाबांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले, “गीदड की खाल…”
या पोस्टवर अमृता खानविलकर हिने देखील रिप्लाय दिला आहे. हे काय आहे, असे तिने विचारले आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या बातमीमुळे नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. ही पोस्ट १ एप्रिलला पोस्ट झाल्याने नेटकऱ्यानी देखील तेवढीच एप्रिल फुलचे निमित्त साधत मजेशीर दाद दिली आहे.
दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास; क्रिकेटसोबतच Actor म्हणून प्रसिद्ध