Friday, May 29, 2026
Homeक्राईमCrime News : अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला

Crime News : अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्ता, वाणीनगर कमानी जवळ एका अल्पवयीन मुलावर (वय 17) धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून सहा जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरख मच्छिंद्र सुद्रीक (रा. बोल्हेगाव), दीनेश शिंदे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पंचवटी, अहिल्यानगर), प्रणव उर्फ बबलू मोकासे (रा. मोकासे वस्ती, सावेडी), सचिन गोरे (पूर्ण नाव माहित नाही, रा. वाणीनगर, सावेडी) व दोन अनोळखी इसम यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगा पाईपलाईन रस्ता, लेखानगर येथे राहत असून, सध्या तो इयत्ता 10 वीमध्ये शिक्षण घेत आहे. 29 मार्च रोजी तो एका व्यक्तीला सोडण्यासाठी दुचाकीवरून पाईपलाईन रस्ता, वाणीनगर कमानी जवळ गेला होता. याच वेळी, त्याचा आत्या भाऊ तेथे उपस्थित होता. त्याचा काही संशयित आरोपींशी वाद असल्याने, त्याचा राग काढण्यासाठी फिर्यादीवर हल्ला करण्यात आला.

गोरख सुद्रीक याने हातात फायटरसारखी वस्तू घेऊन त्याच्या तोंडावर, नाकावर आणि डोक्यावर मारले. धारधार शस्त्राने त्याच्या डाव्या डोळ्याच्या खाली गंभीर जखम केली. दीनेश शिंदे याने खोर्‍याच्या दांड्याने मारहाण केली. प्रणव मोकासे याने फायटरने मारहाण केली. सचिन गोरे आणि इतर दोघांनी दुचाकी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला तसेच लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. हल्लेखोरांनी शिवीगाळ करत तुझ्या आत्याभावाला बोलव, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. एका व्यक्तीने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. फिर्यादी गंभीर जखमी झाल्याने जमिनीवर कोसळले. घटनास्थळी उपस्थितांनी त्याच्या वडिलांना माहिती दिली. त्यानंतर, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Shirdi : उपोषण स्थगित करण्याची आज विनंती करणार – ना. विखे...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असून आज...