Friday, April 25, 2025
HomeराजकीयAmol Mitkari : "त्यांना" चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना?; अमोल मिटकरी...

Amol Mitkari : “त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना?; अमोल मिटकरी यांची खोचक पोस्ट

मुंबई । Mumbai

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्यावर सांगलीत सोमवारी भटक्या कुत्र्याने हल्ला केला. माळी गल्लीमधून जात असताना अचानक एका कुत्र्याने त्यांच्या पायाला चावा घेतला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात हलचल निर्माण झाली आहे. भिडे समर्थक आणि विरोधकांमध्ये नव्याने शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाजमाध्यम ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर टाकलेल्या पोस्टमुळे वातावरण तापले आहे.

“त्यांना” चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना? …..जो कुणी असेल त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे. चावतो म्हणजे काय? मुगलाई लागलीय का?, अशी पोस्ट मिटकरी यांनी समाज माध्यम एक्सवर केली आहे. त्या पोस्टवर उलटसुलट प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. एकूणच या मुद्दावरून शिवप्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधकांत नवीन वाद उफाळला आहे.

https://twitter.com/amolmitkari22/status/1912341537620652362

या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. भिडे समर्थकांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, अनेकांनी मिटकरींवर टीका केली आहे. काहींनी मात्र त्यांच्या उपरोधिक शैलीचे समर्थन करत भिडेंच्या वादग्रस्त विधानांची आठवण करून दिली आहे.

याआधीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यांवरून मिटकरी यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक वादाची पार्श्वभूमी आधीपासूनच होती. कुत्र्याच्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा हा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

संभाजी भिडे कोण आहेत?

संभाजी भिडे हे पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व मानले जातात. सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, मुंबई आणि बेळगाव या भागांमध्ये त्यांचे मोठे समर्थक आहेत. त्यांनी ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेची स्थापना केली असून, ती संस्था छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचे प्रसारक म्हणून कार्य करते.

राजकीयदृष्ट्या भिडे यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी संबंध राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना ‘गुरुजी’ म्हणून संबोधतात. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, उदयनराजे भोसले, आर.आर. पाटील आणि पतंगराव कदम यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मात्र, त्यांनी कधीही प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश केला नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...